आपल्याला दैनंदिन जीवनात पैसे हे अत्यंत महत्वाचे असतात. कोणत्याही वस्तूंची खरेदी करण्यासाठी पैसे हे महत्वाचे असतात. पण या पैशांच्या बाबतीत कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का ? आपल्या भारतीय चालनातल्या नोटांवर दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नाही तर महात्मा गांधीजी यांचाच का फोटो छापला जातो?जाणून घ्या यामागचे खरे गुपित काय ....
प्रत्येक देशाच्या चलनावर कोणत्या ना कोणत्या महापुरुषाचा फोटो असतो. हा फोटो त्या त्या देशाच्या प्रतिमेचं प्रतिनिधीत्व करतो.भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी नोटांवर हत्ती आणि राजाचे, वनस्पतींचे चित्र छापले जायचे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही आपल्या नोटांवर ब्रिटिशांचे वर्चस्व होते. भारतीय नोटांवर किंग जॉर्ज VI यांचा फोटो छापला जात होता. नंतर 1949 मध्ये भारत सरकारने नवीन डिझाईन लॉन्च केली.
यामध्ये किंग जॉर्ज यांच्या जागी अशोक स्तंभाचा फोटो छापण्यात आला. भारतीय नोटांवर रवींद्रनाथ टागोर, मदर तेरेसा आणि अबुल कलाम आझाद यांच्या फोटोबद्दल चर्चा चालू होती. त्यानंतर महात्मा गांधी यांची राष्ट्रीय स्तरावरील लोकप्रियता पाहता यांच्या फोटोचा विचार करण्यात आला. त्यानंतर अखेर 1969 मध्ये पहिल्यांदा महात्मा गांधींचा फोटो भारतीय नोटेवर झळकला. त्यांच्या 100 व्या जन्मदिवसानिमित्त हा निर्णय घेण्यात आला होता. या नोटेवर गव्हर्नर एल के झा यांची स्वाक्षरी होती. फोटोत गांधीजींच्या मागे सेवागाम आश्रम दाखवण्यात आला होता.
देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत होती त्यामुळे 1987 पासून प्रत्येक चलनावर गांधीजींचा फोटो छापण्यात आला. ऑक्टोबर 1987 मध्ये पहिल्यांदाच 500 च्या नोटा चलनात आणल्या आणि यावरही महात्मा गांधींचं छायाचित्र होतं. अशोक स्तंभ वॉटरमार्कमध्ये होता. १९८७ पासून आजतागायत नोटांवर अनेक बदल झालेले पाहायला मिळाले मात्र एक गोष्टी कायम राहिली ती म्हणजे भारतीय नोटांवरचे गांधीजी. आणि आजतागायत ती कायम आहे.