पेट्रोल डिझेलचा पुन्हा भडका 
India

Petrol-Diesel Price Hike | पेट्रोल डिझेलचा पुन्हा भडका!

Published by : Shweta Chavan-Zagade

देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरुच आहे. देशातील सर्वच महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price Hike) किंमतींनी उच्चांक गाठला आहे. अशातच आज (25 मार्च) पेट्रोल-डिझेलच्या दरांत प्रत्येकी 83 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर जारी करण्यात आले आहेत. अशाप्रकारे चार दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2.40 रुपयांची वाढ झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price Hike) दरात वाढ न झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. पण आता पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी सकाळपासून पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price Hike) दरामध्ये पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता पुन्हा एकदा त्रस्त झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याचं नाव घेत नाही. देशाच्या राजधानीसह सर्वच प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price Hike) दरांनी उच्चांक गाठला आहे.

या वाढीनंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) पेट्रोलचे दर प्रति लिटर 84 पैशांनी वाढले असून डिझेलचे (Petrol-Diesel Price Hike) दर 85 रुपये प्रति लिटरनं वाढले आहेत. मुंबई पेट्रोल प्रति लिटर 112.51 रुपये तर डिझेल प्रति लिटर 96.70 वर पोहोचलं आहे.

-पुण्यात आज पेट्रोल तब्बल 112 रुपयांवर
-पेट्रोलमध्ये 81 पैसे तर डिझेलमध्ये 83 पैशाची वाढ.
-पेट्रोल आधी 111.19 आता 112 रुपये तर डिझेल आधी 93.97 आता 94.80 रुपये लिटर

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा