India

पेट्रोल-डिझेल महागले, पण दारु विक्रेत्यांना दिलासा

Published by : Shweta Chavan-Zagade

मंगळवारी देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price) कडाडलं आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतीत आज सातव्या दिवशीही वाढ करण्यात झाली असून  पेट्रोलच्या दरांत 84 पैसे प्रति लिटर, तर डिझेलच्या दरांत 74 पैशांची वाढ झाली आहे. आजच्या दरवाढीनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या दरांत प्रति लिटर 84 पैशांची तर डिझेलच्या दरांत 74 पैशांची वाढ झाली आहे. तर दरवाढीनंतर देशाच्या राजधानीत पेट्रोल 100.21 रुपये आणि डिझेल 91.47 रुपयांवर पोहोचलं आहे.

मद्य विक्रेत्यांसाठी हा निर्णय

जानेवारी महिन्यात राज्य सरकारने मद्यविक्री करणाऱ्या परवाना धारकांच्या शुल्कात 15 ते 100 टक्के वाढ केली होती. त्यानंतर मद्य विक्रेता संघटनांनी सरकारला न्यायालयात खेचण्याची धमकी दिली होती. अखेर उत्पादनशुल्क मंत्री अजित पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीत मद्य विक्रेत्यांना वाढीव दर न परवडणारे असल्याचं सांगत वाढीव दर कमी करा असा सूर मांडला. त्यानंतर सरकारने माघार घेत परवाना शुल्कमध्ये 15 ते 100 टक्के वाढ रद्द करत सरसकट 10 टक्के वाढ केल्याचं जाहीर केले.

मुंबईत पेट्रोलचे दर

मुंबईत (Mumbai Petrol) आता पेट्रोल 115.04 रुपये आणि डिझेल 99.25 रुपये दराने विकले जात आहे.चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 76 पैशांनी वाढला असून तो आता 105.94 रुपये आणि डिझेल 96 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 109.68 रुपये आणि डिझेल 94.62 रुपये आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर पेट्रोल डिझेलचे दर भारतात सातत्याने वाढत आहेत. काही दिवसांपुर्वी नामांकित दुधाच्या किमतीत देखील वाढ झाली. त्यानंतर एलपीजी सिलेंडरमध्ये चक्क 50 रूपयांनी वाढ करण्यात आली. सातत्याने होत असलेल्या दरवाढी विरोधात विरोधकांकडून सातत्याने केंद्र सरकारवरती टीका केली जात आहे.

महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शहरात पेट्रोल डिझेलचा दर किती ?

शहर पेट्रोल डिझेल

कोल्हापूर 115.38 98.08

पुणे 114.4 97.11

अहमदनगर 114.93 97.69

औरंगाबाद 115.66 98.36

चंद्रपूर 111.47 98.38

गडचिरोली 115.9 98.66

नागपूर 114.69 97.48

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक