व्हॅलेन्टाईन्स डे जवळ येत आहे, आणि मुलींमध्ये पार्लरमध्ये जाण्याचा ट्रेंड वाढतोय. कुणी क्लीनअप करुन घेते तर कुणी फेशियल. पण तुम्हाला आता घरच्या घरी फक्त ५० रुपयांत एक खास फेशियल करून घ्यायचा असल्यास, आम्ही तुम्हाला सोपा आणि प्रभावी उपाय सांगत आहोत, जो तुमच्या त्वचेला चमकदार आणि ताजेतवाने बनवेल.
फेशियलमध्ये सर्वाधिक फायदेशीर मानलं जाणारं हायड्रा फेशियल महाग आणि वेळखाऊ ठरतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी हायड्रा फेशियलइतकंच प्रभावी आणि सोपं फेशियल कसं करायचं ते सांगणार आहोत.
स्टेप 1: फेशियलसाठी सर्वप्रथम चेहरा स्वच्छ करणे आवश्यक आहे. २ चमचे कच्चे दूध घेऊन कापसाच्या बॉलाने चेहरा हलक्या हालचालींनी साफ करा. यामुळे घाण, तेल दूर होऊन त्वचेवर नैसर्गिक चमक येईल.
स्टेप 2: क्लिंजिंग नंतर स्क्रबिंग करा. १ चमचा तांदळाचे पीठ आणि १ चमचा दही एकत्र करून चेहऱ्यावर हलक्या गोलाकार हालचालींनी लावा. मृत त्वचेच्या पेशी दूर होतील आणि त्वचा मऊ, ताजेतवाने बनेल.
स्टेप 3: आता चेहऱ्यावर वाफ घेण्याची वेळ आहे. ४–५ मिनिटे गरम पाण्याची वाफ घेऊन चेहऱ्यावरील छिद्रे उघडा, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा अधिक ताजेतवाने व चमकदार बनते.
स्टेप 4: वाफ घेतल्यानंतर चेहऱ्यावर ग्लो मास्क लावा. बीटचा रस, मुलतानी माती, गुलाबजल आणि मध एकत्र करून तयार केलेली पेस्ट १०–१५ मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. नंतर धुवून टाका, त्वचा गुलाबी आणि चमकदार बनेल.
स्टेप 5: शेवटी चेहरा मॉइश्चराइज करा. ओलावा टिकवण्यासाठी आवडीचा मॉइश्चरायझर वापरा किंवा घरी बनवा – कोरफडीचा गर आणि बदाम तेल समान प्रमाणात मिक्स करून हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा, त्वचा हायड्रेट आणि मऊ बनेल.
ही माहिती तज्ज्ञांच्या चर्चांवर आधारित असून, सामान्य मार्गदर्शन म्हणून दिली आहे. वैयक्तिक सल्ल्यासाठी नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कोणत्याही नुकसानाची जबाबदारी न्यूज-18 घेणार नाही, त्यामुळे सल्ला वापरताना काळजी घ्या.