Fluffy Idli Recipe 
फोटोगॅलरी

Fluffy Idli Recipe : इडली कडक होतेय का? ईनोशिवाय घरच्या घरी बनवा स्पाँजी इडली, वाचा सोपी ट्रिक

Soft Idli Healthy Breakfast: घरच्या घरी हॉटेलसारखी हलकी इडली तयार करून नारळाची चटणी, सांभर किंवा कुरकुरीत डोसा सोबत स्वादिष्ट नाश्ता घ्या.

Published by : Dhanshree Shintre

सकाळचा नाष्टा असो की मुलांचा डबा, वाफाळलेली मऊ इडली ही सर्वात आरोग्यदायी आणि आवडती निवड आहे. मात्र, अनेकांच्या घरात ती हॉटेलसारखी मऊ का होत नाही, हे नेहमीच विचारले जाते.

कधी इडली कडक होते, तर कधी फुगत नाही, त्यामुळे लोक ईनो किंवा बेकिंग सोडा सारख्या रसायनांचा वापर करतात, जे आरोग्यासाठी योग्य नाही. जर तुम्हाला नैसर्गिकरीत्या मऊ, लुसलुशीत आणि हलकी इडली हवी असेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत.

इडली मऊ आणि फुगट होण्यासाठी डाळ आणि तांदळाचे योग्य प्रमाण महत्त्वाचे आहे. उडीद डाळ १ कप आणि तांदूळ २ कप वापरा (जाड तांदूळ उत्तम). मीठ चवीनुसार घाला, त्यामुळे इडली हलकी आणि स्वादिष्ट बनेल.

टीप महत्वाची: जर डाळ जास्त झाली तर इडलीला फक्त डाळीचा स्वाद येतो आणि चव बिघडते. त्यामुळे उडीद डाळ आणि तांदूळ याचे प्रमाण १:२ राखणे सर्वात योग्य मानले जाते.

हॉटेलसारखी मऊ इडलीसाठी सुरुवात भिजवण्यापासून करा. उडीद डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुऊन, पुरेसे पाणी घालून किमान 8 तास किंवा रात्रभर भिजत ठेवा, जेणेकरून पीठ चांगले तयार होईल.

सकाळी भिजवलेले डाळ-तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटा, पीठ खूप घट्ट किंवा पातळ होऊ नये. नंतर मोठ्या भांड्यात काढून 1 तास झाकून ठेवा, जेणेकरून नैसर्गिक आंबण्याची प्रक्रिया सुरू होईल.

एक तास आंबल्यावर पिठात चवीनुसार मीठ घाला. मीठ टाकल्यानंतर पीठ हलक्या हाताने मिक्स करा, ज्यामुळे नैसर्गिक हलका आंबटपणा तयार होतो आणि इडलीला उत्कृष्ट चव मिळते.

इडली पात्रात थोडे तेल लावा आणि पीठ भरा. कुकरमध्ये पाणी टाकून स्टँड ठेवा, शिट्टी काढा आणि मध्यम आचेवर 6–7 मिनिटे वाफवा. चाकू किंवा टूथपिक स्वच्छ बाहेर आल्यास इडली तयार आहे.

ही इडली नैसर्गिकरित्या फुगलेली आणि मऊ राहणारी आहे, ईनो किंवा सोड्याशिवाय बनते. पचायला हलकी असून नारळाची चटणी, शेंगदाणा चटणी किंवा वाफाळलेले सांभरसोबत सर्व्ह करता येते. त्याच पिठापासून कुरकुरीत डोसे देखील तयार करता येतात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा