Google
फोटोगॅलरी

Makeup Removal Tips : त्वचेला हानी न पोहोचवता नैसर्गिक पद्धतीने मेकअप कसा काढाल? जाणून घ्या सोपे घरगुती उपाय

Published by : Siddhi Naringrekar

सर्वजण कार्यक्रमांसाठी मेकअप करतात. मात्र जेव्हा मेकअप काढण्याची वेळ येते तेव्हा मात्र तो व्यवस्थित काढता येत नाही. मेकअप काढताना नीट न काढल्यास चेहऱ्याला त्रास होऊ शकते. मेकअप व्यवस्थित काढला न गेल्यास त्वचा कोरडी होऊ शकते. चला तर आज आम्ही तुम्हाला काही त्वचेला हानी न पोहोचवता नैसर्गिक पद्धतीने मेकअप कसा काढाल हे सांगणार आहोत

कोरफडीचे जेल

मेकअप काढण्यासाठी तुम्ही कोरफडीचे जेलचा वापर करू शकता. कोरफडीचे जेल हातावर घेऊन हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा आणि चेहरा धुवून टाका. चेहऱ्यासाठी कोरफड खूप फायदेशीर आहे.

नारळाचे तेल

मेकअप काढताना सर्वात आधी चेहऱ्याला नारळाचे तेल लावा. नारळ्याचे तेल लावून कापसाने मेकअप पुसून टाका.

दही आणि दूध

दही आणि दुधाचे एकत्र मिश्रण करून ती पेस्ट चेहऱ्याला थोडावेळ लावून ठेवा. थोड्यावेळानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. असे केल्यास मेकअप सहज काढण्यास मदत होईल.

गुलाब पाणी

मेकअप काढण्यासाठी गुलाबपाणी खूप उपयोगी ठरते. कापसाच्या गोळ्यावर गुलाब पाणी घेऊन हलक्या हाताने मेकअप साफ करावा. गुलाब पाण्याने मेकअप साफ केल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा.

बदाम तेल

मेकअप काढताना बदामाच्या तेलाचा तुम्ही वापर करू शकता. बदाम तेल हातावर घेऊन हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. त्यानंतर ओल्या कपड्याने किंवा कोमट पाण्याने चेहरा धुवा. बदाम तेल त्वचेला हायड्रेट करते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा