फोटोगॅलरी

IncomeTax 2026 : 1 एप्रिल 2026 पासून नवे आयकर नियम लागू; डिजिटल फायलिंग अनिवार्य

केंद्र सरकारने 1 एप्रिल 2026 पासून देशभरात नवे आयकर नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 60 वर्षांपासून लागू असलेला इन्कम टॅक्स अॅक्ट

Published by : Varsha Bhasmare

केंद्र सरकारने 1 एप्रिल 2026 पासून देशभरात नवे आयकर नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 60 वर्षांपासून लागू असलेला इन्कम टॅक्स अॅक्ट, 1961 आता संपुष्टात येणार असून त्याऐवजी ‘इन्कम टॅक्स रुल्स 2026’ लागू केले जाणार आहेत. आयकर विभागाने यासंदर्भातील मसुदा नियम सार्वजनिक चर्चेसाठी खुले केले असून 22 फेब्रुवारी 2026 पर्यंत नागरिकांना आपले अभिप्राय नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे.

आयटीआर-1 हा पगार, घरभाडे आणि बँकेच्या व्याजावर उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठीचा सोपा फॉर्म आहे. नव्या नियमानुसार हा फॉर्म भरताना डिजिटल पेमेंटद्वारेच प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

आयटीआर-2 हा कॅपिटल गेन, एकापेक्षा अधिक मालमत्ता, परदेशी उत्पन्न किंवा विदेशातील संपत्ती असलेल्या करदात्यांसाठी आहे. आयटीआर-1 साठी पात्र नसल्यास थेट आयटीआर-2 भरावा लागेल.

आयटीआर-3 हा व्यवसायिक आणि व्यावसायिक (प्रोफेशनल) करदात्यांसाठीचा प्रमुख फॉर्म असेल.

PAN कार्डच्या नियमांमध्येही मोठे बदल सुचवले आहेत. एका वर्षात 10 लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी PAN कार्ड आवश्यक राहणार नाही. यापूर्वी एका दिवसात 50 हजार रुपयांपेक्षा जास्त व्यवहारासाठी PAN देणे बंधनकारक होते. हॉटेल बिलासाठी PAN ची मर्यादा 50 हजारांवरून 1 लाख रुपये करण्यात आली आहे. मालमत्ता खरेदी-विक्री आणि भेटवस्तूंसाठीची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख रुपये करण्याची शिफारस आहे. वाहन खरेदीसाठी 5 लाख रुपयांपर्यंत PAN ची गरज नाही; त्यापेक्षा जास्त किंमतीसाठी PAN अनिवार्य असेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा