राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत त्यांची गटनेतेपदी निवड झाली आणि त्यानंतर राजभवनात शपथविधी पार पडला.शपथविधीला दहा दिवस उलटल्यानंतर आज त्या औपचारिकरित्या उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांची पहिली उपस्थिती आहेत.
सुनेत्रा पवार यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या.
कारभार सुरू करण्यापूर्वी त्यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आणि चैत्यभूमीवर बाबासाहेबांना वंदन केले.
विधानभवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करत त्यांनी आशीर्वाद घेतला.
दालनात प्रवेश करताना खुर्ची आणि टेबलाला नमस्कार करताच वातावरण भारावून गेले. हा क्षण पाहून पार्थ पवार भावूक झाले.
पहिली कॅबिनेट बैठक, विकासाला चालना आणि जनतेचे प्रश्न सोडवणे हेच आपले ध्येय असल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.