TODAY’S TOP BREAKING NEWS: 5 MAJOR DEVELOPMENTS YOU MUST KNOW 
फोटोगॅलरी

Today’s Top Breaking News: आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी, जाणून घ्या…

Indian Politics News: आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या पाच घडामोडींचा सविस्तर आढावा. राजकारण, अर्थकारण, क्रीडा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ताज्या बातम्या एका क्लिकवर जाणून घ्या.

Published by : Dhanshree Shintre

लाडकी बहीण योजना

महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये जानेवारी हप्त्याच्या विलंबाबाबत चिंता आहे. फेब्रुवारी सुरू असला तरी अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. आता चांगली बातमी आहे की, रखडलेले तीन हप्ते (नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी) एकत्र देण्यात येणार असून, काहींना १५०० रुपये आणि काहींना ४५०० रुपये मिळतील.

नवरदेव विवाहस्थळावरून पळाला

मागील काही दिवसांत किनवट तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने कुटुंब संस्था आणि पारंपरिक मूल्यांबाबत चिंता वाढवली आहे. लग्नाच्या काही तास आधी बोहल्यावर चढण्यास सज्ज असलेला नवरदेव विवाहस्थळावरून निघून गेला. हा युवक पोलिस दलातील कर्मचारी असल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होत आहे. या घटनेमुळे विवाहातील जबाबदारी, विश्वास आणि कुटुंब संवादाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

आधार कार्ड अपडेट

आधार कार्ड संदर्भात दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने गैरवापर रोखण्यासाठी २.५ कोटींहून अधिक मृत व्यक्तींचे आधार क्रमांक निष्क्रिय केले आहेत. लोकसभेत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी दिलेल्या लेखी उत्तरानुसार, ही कारवाई आधार डेटाबेसची शुद्धता आणि अचूकता कायम ठेवण्यासाठी देशव्यापी मोहिमेचा भाग आहे. जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक ओळख प्रणाली असलेल्या आधारमध्ये सध्या १.३४ अब्ज सक्रिय धारक आहेत.

शाळांना सुट्टी जाहीर

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणाऱ्या क्षेत्रातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी राहणार आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.

बिग बॉस मराठी

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पुन्हा एकदा वादाचा भडका उडाला आहे. नुकत्याच आलेल्या प्रोमोमुळे घरातील तणाव चांगलाच वाढल्याचं दिसतंय. किचनमध्ये सागर (Sagar Karde) आणि तन्वी (Tanvi Kolte) यांच्यात अचानक सुरू झालेलं बोलणं थेट जोरदार भांडणात बदललं. काम करत असताना दोघांमध्ये गैरसमज झाला आणि शब्दांची देवाणघेवाण सुरू झाली. तन्वीने सागरच्या बोलण्यावर नाराजी व्यक्त केली, तर सागरनेही माघार घेतली नाही. दोघांचाही सूर चढत गेल्याने वातावरण अधिकच तापलं. इतर सदस्यांनी वाद थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

सोने-चांदी दर

गुरुवारी (5 फेब्रुवारी) सराफा बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सकाळी व्यवहार सुरू होताच सोने आणि चांदीच्या दरांनी खालीचा मार्ग धरला. आंतरराष्ट्रीय बाजारात सुरुवातीला किंचित तेजी दिसली, मात्र काही वेळातच दर जोरात कोसळले. चांदीला सर्वाधिक फटका बसला. एमसीएक्सवर चांदीच्या भावात जवळपास दहापर्यंत टक्के घसरण झाली आणि दर थेट मोठ्या फरकाने खाली आले. सोन्याचे दरही दबावाखाली आले असून, सकाळच्या सत्रात सोनं दोन टक्क्यांहून अधिक घसरले.

पुणे–मुंबई महामार्ग

पुणे–मुंबई हा राज्यातील अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा महामार्ग मंगळवार रात्री घडलेल्या अपघातामुळे तब्बल ३२ तास ठप्प झाला होता. बुधवारी रात्री दीडच्या सुमारास एका गॅस टँकरचा भीषण अपघात झाला. संबंधित टँकर पलटी झाल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अखेर प्रशासनाच्या अथक प्रयत्नांनंतर गुरुवारी सकाळपासून वाहतूक हळूहळू सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे.

हवामानात बदल

राज्यातील हवामानात सध्या मोठे बदल पाहायला मिळत आहेत. कडाक्याच्या थंडीने ओळखला जाणारा हिवाळा हळूहळू राज्यातून गायब होत असून, त्याजागी उकाडा आणि ढगाळ वातावरणाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडी, पाऊस आणि उकाडा असे तिन्ही ऋतू एकाच वेळी अनुभवायला मिळत आहेत. डिसेंबर महिन्यात थंडीचा जोर कायम होता, मात्र १ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या अवकाळी पावसानंतर वातावरणात सातत्याने बदल होत असल्याचे चित्र आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा