TODAY’S TOP BREAKING NEWS: 5 MAJOR DEVELOPMENTS YOU MUST KNOW 
फोटोगॅलरी

Today’s Top Breaking News: आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी, जाणून घ्या…

Indian Politics News: आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या पाच घडामोडींचा सविस्तर आढावा. राजकारण, अर्थकारण, क्रीडा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ताज्या बातम्या एका क्लिकवर जाणून घ्या.

Published by : Dhanshree Shintre

लाडकी बहीण योजना

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान दुर्घटनेत अकाली मृत्यू झाल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडी वेगवान झाल्या आहेत. सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व स्वीकारले असून, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, सर्व मागणींवर एकत्र बसून निर्णय घेता येईल, असे म्हटले आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (एक्सप्रेसवे) आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता प्रोफोलीन गॅस टँकर पलटी झाल्यापासून २२ तासांहून अधिक काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. गॅस गळतीमुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव दोन्ही दिशेने वाहने थांबवली गेली असून, २० किलोमीटर लांब जाम लागला आहे. यामुळे शेकडो वाहने, प्रवासी आणि एसटी बसेस अडकून पडल्या आहेत. अन्न-पाण्यापासून वंचित प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत, तर राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या सर्व बस रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

एअरटेलने प्रीपेड यूजर्स

भारती एअरटेलने प्रीपेड यूजर्ससाठी आणखी एक खास सरप्राईज आणले आहे. देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेलने त्यांच्या निवडक प्रीपेड रिचार्ज प्लॅन्समध्ये अनलिमिटेड 4G डेटाची सुविधा सुरू केली आहे. यापूर्वी कंपन्या अनलिमिटेड 5G डेटा देत असत, पण आता एअरटेल यूजर्सना अनलिमिटेड 4G आणि 5G दोन्ही डेटा एकत्र ऑफर करत आहे. ही सुविधा कंपनीने नवीन प्लॅन्स लाँच न करता, जुन्या 399 रुपये आणि 449 रुपयांच्या प्लॅन्समध्ये जोडली आहे.

सोने-चांदी दर

देशात सध्या सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहेत. जागतिक बाजारातील घडामोडी, डॉलर-रुपया विनिमय दर, आंतरराष्ट्रीय पातळीवरील महागाई, तसेच गुंतवणूकदारांचा कल याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतींवर होत आहे. ४ फेब्रुवारी रोजी भारतात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये फारसा मोठा बदल दिसून आला नसला, तरी दर उच्च पातळीवर कायम असल्याने ग्राहक आणि गुंतवणूकदारांचे लक्ष या किमतींकडे लागले आहे

सुनील केदार यांचा राजीनामा

नाशिकचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी राजीनामा दिला आहे. महापौर आणि उपमहापौर नाव निश्चितीवर सुनील केदार नाराज असल्याची माहिती मिळत असून प्रदेश पातळीवरून आलेले महापौर आणि उपमहापौर नाव ऐनवेळी बदलण्यात आल्याने सुनील केदार यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे.

अजित पवार निधन चर्चा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक निधनाने राज्याच्या राजकारणातच नाही, तर पवार कुटुंबातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ त्यांच्या खासगी विमानाचा अपघात झाला आणि या दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. हा धक्का पचवण्याआधीच राज्यात राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्यावरून चर्चा रंगू लागल्या आहेत.

आयसीसी टी२० वर्ल्ड कप

आयसीसी टी२० वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात होत असताना एका रंजक इतिहासाची आठवण येते. या स्पर्धेला २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत ‘वर्ल्ड टी-२०’ म्हणून सुरुवात झाली आणि भारताने पहिले जेतेपद जिंकले. मात्र, २०२० मध्ये पुरुष आणि महिला दोन्ही टी२० स्पर्धांचे नाव ‘टी२० वर्ल्ड कप’ असे बदलण्यात आले. हा बदल का आणि कशासाठी, याबाबत तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आता नव्या पर्वाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा चर्चा रंगली असून, आयसीसीने स्पष्ट केले आहे की, हे नाव जागतिक व्यासपीठावर स्पर्धेचे प्रोफाइल भक्कम करेल आणि टी२० क्रिकेटचा प्रसार वाढवेल.

बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठीच्या घरात आजचा दिवस वेगळ्याच रंगात रंगणार आहे. नेहमीच्या वादांऐवजी यावेळी आयुष आणि तन्वी यांच्यात मोकळा संवाद पाहायला मिळणार आहे. दोघेही आपल्या स्वभावाबद्दल बोलताना मजेशीर तुलना करताना दिसतील. आयुष स्वतःला शांत आणि साधा स्वभावाचा म्हणतो, तर तन्वीला तो तिखट आणि ऊर्जावान व्यक्तिमत्त्वाची उपमा देतो.

शरद पवार यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

मुंबईतील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर ही पहिली भेट असल्यामुळे याचे महत्व वाढले आहे. तसेच, सध्या दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलिनीकरणाच्या शक्यतांवरही चर्चा जोरदार सुरु आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा