होळीच्या रंगीत उत्सवासाठी देशभरातून लाखो लोक गावाकडे रेल्वेने परतणार असून, रेल्वे मंत्रालयाने मार्च महिन्यात तब्बल १४१० अतिरिक्त स्पेशल गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी २०२५ मध्ये होळीनिमित्त ११४४ गाड्या चालवण्यात आल्या होत्या, पण यंदा प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन ही संख्या दीडपट केली आहे.
राज्यातील शेतजमिनींच्या नोंदींमध्ये असलेला जुना गोंधळ दूर करण्यासाठी महसूल विभागाने नवा निर्णय घेतला आहे. जमिनीचे नकाशे आणि ७/१२ उतारे यामधील विसंगती मिटवण्यासाठी आता पोटहिश्शांची प्रत्यक्ष मोजणी केली जाणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवला जात आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. e-KYC प्रक्रियेत चूक झालेल्या महिलांना आता पुन्हा एकदा दुरुस्तीची संधी मिळणार आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर घोषणा करत सांगितले की, ३१ मार्च २०२६ पर्यंत ही सुविधा उपलब्ध राहील. e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडल्याने अनेक लाभार्थ्यांना तक्रारी कराव्या लागल्या होत्या, विशेषतः ज्यांनी प्रक्रिया पूर्ण केली तरीही योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांच्यासाठी ही मोठी मदत ठरेल.
आजकाल लोक नोकरीसोबत किंवा स्वतंत्रपणे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत, पण मुख्य अडचण म्हणजे सुरुवातीची गुंतवणूक. सुदैवाने, आता असे अनेक व्यवसाय आयडिया उपलब्ध आहेत ज्या फक्त ६०,००० रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीत सुरू करता येतात. योग्य मेहनत आणि मार्केटिंगने या व्यवसायातून महिन्याला लाखो रुपये कमावणे शक्य आहे.
Veteran Nepali Actor Sunil Thapa Passes Away at 68: मनोरंजन क्षेत्रासाठी एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध नेपाळी अभिनेते सुनील थापा यांचे निधन झाले आहे. 68 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. अचानक तब्येत खालावल्यानंतर त्यांना काठमांडू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा नाराजी पसरली आहे. नियमित पगार जमा झाला असला, तरी वेतनवाढीचा थकबाकी हप्ता न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचा संयम सुटत आहे. सरकारने दिलेल्या शब्दानंतरही पैसे न आल्याचा आरोप करत एसटी कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
BJP's Ritu Tawde has been elected as the Mayor of Mumbai : मुंबई महापालिकेच्या निवडणुकांनंतर अखेर महापौर आणि उपमहापौर पदांवरील सस्पेन्स संपला आहे. आज भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या संयुक्त बैठकीत दोन्ही पदांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Serial Off Air : गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या घराघरात हसवणारी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. तब्बल १७ वर्षे सुरू असलेल्या या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. जेठालाल, दयाबेन, टप्पू सेना आणि गोकुळधाममधील सगळीच पात्रे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.