TODAY’S TOP BREAKING NEWS: 5 MAJOR DEVELOPMENTS YOU MUST KNOW 
फोटोगॅलरी

Today’s Top Breaking News: आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी, जाणून घ्या…

Indian Politics News: आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या पाच घडामोडींचा सविस्तर आढावा. राजकारण, अर्थकारण, क्रीडा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ताज्या बातम्या एका क्लिकवर जाणून घ्या.

Published by : Dhanshree Shintre

फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरू असतानाही लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेले नाहीत, ज्यामुळे लाखो लाभार्थींच्या मनात चिंता आणि प्रश्न निर्माण झाले आहेत. मागच्या डिसेंबर हप्त्याप्रमाणेच जानेवारीचा निधीही उशिरा येण्याची शक्यता आहे, तर फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत चर्चा रंगली असून, दोन्ही हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टी-२० विश्वचषक स्पर्धेत सध्या जोरदार लढती पाहायला मिळत असून, प्रत्येक संघ ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी धडपडत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ८ फेब्रुवारी रोजी खेळला जाणार असून, भारत हा प्रबळ दावेदार म्हणून पुढे सरसावला आहे. मात्र, वेस्ट इंडीजचा स्टार फलंदाज शेरफेन रुदरफोर्ड याने त्याच्या तुफानी फॉर्ममुळे भारतीय चाहत्यांमध्ये चिंता निर्माण केली असून, तो भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांमुळे आर्थिक आधार मिळत असून, फेब्रुवारी महिन्यात लाखो शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनांचे हप्ते जमा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारची पीएम किसान समान निधी योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६,००० रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात, जे दर चार महिन्यांनी थेट लाभार्थी खात्यात जमा होतात.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीच्या फरकाची हप्ता रक्कम तात्काळ मिळावी या मागणीसाठी २४ फेब्रुवारी रोजी ‘बोंब मारो’ आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे. एसटी कर्मचारी संघटनांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, शासनाच्या अर्थ खात्याकडून वेतनवाढ फरकाचा हप्ता अद्याप मिळालेला नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसईसह विविध बोर्डांच्या परीक्षा सुरू होताच घरात अभ्यासाचे वातावरण तयार होते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा असला तरी तणाव वाढण्याची शक्यता असते. गुणांची अपेक्षा, मोठा अभ्यास आणि वेळेची धावपळ यामुळे मन अस्वस्थ होऊ शकते. पण थोडे शहाणपणाने वागल्यास परीक्षा काळ सहज पार करता येतो. सर्वप्रथम अभ्यासाचा ढिगारा पाहून घाबरू नका. विषय छोटे-छोटे भाग करून रोजचे उद्दिष्ट ठरवा. वेळेचे नीट नियोजन केल्यास काम सोपे वाटते. कठीण धडे आधी पूर्ण केल्यास आत्मविश्वास वाढतो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा