TODAY’S TOP BREAKING NEWS: 5 MAJOR DEVELOPMENTS YOU MUST KNOW 
फोटोगॅलरी

Today’s Top Breaking News : आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी, जाणून घ्या…

Indian Politics News: आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या पाच घडामोडींचा सविस्तर आढावा. राजकारण, अर्थकारण, क्रीडा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ताज्या बातम्या एका क्लिकवर जाणून घ्या.

Published by : Riddhi Vanne
Palghar Rain

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सकाळी गारवा, दुपारी उकाडा आणि सायंकाळी ढगाळ वातावरण अशा बदलत्या परिस्थितीत आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने मंगळवारी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करत राज्यातील 11 जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे.

मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई ते नाशिक थेट लोकल रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार आहे. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी एका कार्यक्रमात याबाबत माहिती दिली. ही सेवा सुरू झाल्यानंतर मुंबई आणि नाशिकमधील कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होईल आणि प्रवाशांना जलद, सुरक्षित व आरामदायी प्रवासाचा लाभ मिळेल.

महाराष्ट्रातील दुर्गम खेडे आणि आदिवासी पाड्यांपर्यंत एसटी बस सेवा पोहोचवण्याचे स्वप्न आता सत्यात उतरू लागले आहे. राज्य परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी म्हटले की, “आता केवळ गावात एसटी नसेल तर आदिवासी पाड्यातही एसटी सेवा पोहोचणार आहे.” हा निर्णय महाराष्ट्रातील दुर्गम भागांतील विकासाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सिंगापूर (Singapore) देशासोबत होणाऱ्या व्यावसायिक चर्चांमध्ये सहभागी होण्यासाठी खासदारांचा एक विशेष गट नेमण्यात आला असून, या गटाचे नेतृत्व सुप्रिया सुळे करणार आहेत. संसदीय डिप्लोमसीच्या या मोहिमेत विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा समावेशही करण्यात आला आहे, ज्यामुळे ही जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरली आहे.

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या मुंबई महापालिकेचा 2026-27 चा अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे. यात पुढील क्षेत्रांनी भरीव निधी मिळण्याची शक्यता आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी मुंबई महापालिका उद्या 2026-27 चा वार्षिक अर्थसंकल्प सादर करणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपप्रणित महायुतीने विजय मिळवला असून महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी निवडले गेले आहेत. नव्या नेतृत्वाखालील हा पहिला अर्थसंकल्प असल्यामुळे त्याकडे नागरिकांचे विशेष लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा