Google
फोटोगॅलरी

Skin Care Tips : चेहऱ्यावरील पिंपल्समुळे त्रस्त? करा 'हे' उपाय आणि मिळवा निरोगी त्वचा

Published by : Siddhi Naringrekar

आपला चेहरा चांगला तजेलदार दिसावा असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र चेहऱ्यावरील पिंपल्समुळे अनेकजण हैराण झालेले असतात. चेहऱ्यावर पिंपल्स येणे ही सामान्य समस्या आहे. बदलते हवामान, धूळ, प्रदूषण आणि तेलकट, मसालेदार पदार्थांचे जास्त सेवन केल्याने पिंपल्स येतात. या पिंपल्सवर अनेक उपाय केले जाता. अनेक क्रिम, तेलाचा वापर केला जातो. मात्र त्याने काही फरक पडत नाही. चला तर आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे मुरुमे कमी होण्यास मदत होईल.

चेहरा नियमित धुणे

दिवसातून दोनदा चेहरा धुणे आवश्यक असून त्यामुळे चेहऱ्यावरील घाणं निघून जाण्यास मदत होते. त्वचेवरील धूळ, अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते. चेहरा नियमित धुणे गरजेचं आहे.ज्यामुळे पिंपल्सची समस्या कमी होईल.

हळद आणि दुधाची साय

हळद आणि दुधाची साय चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. हळद आणि दुधाची साय मिक्स करून त्याची पेस्ट चेहऱ्याला लावून ठेवावी. त्यानंतर थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवावा

भरपूर पाणी पिणे

भरपूर पाणी प्यायल्याने त्वचा चमकदार राहते. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. ज्यामुळे मुरुमे पुरळ कमी होतात.

कडुलिंब

चेहऱ्यावरील पिंपल्सवर कडुलिंबाचा पाला फायदेशीर ठरतो. कडुलिंबाच्या पानांची बारीक पेस्ट करून ती पिंपल्सवर लावल्याने मुरुमे कमी होण्यास मदत होते.

कोरफड जेल

कोरफडीचा जेल पिंपल्सवर लावल्याने मुरुमे पुरळ कमी होण्यास मदत होते. त्वचेला यामुळे थंडावा मिळतो. चेहऱ्यावर ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा