Google
फोटोगॅलरी

घसा खवखवण्यापासून त्वरित आराम मिळण्यासाठी 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा

Published by : Siddhi Naringrekar

कोणताही थंड पदार्थ खाल्ल्यास घसा खवखवण्याचा त्रास होतो. बदलत्या वातावरणामुळे देखील सर्दी, खोकला, घसा खवखवण्याचा त्रास होतो. यावर अनेक उपाय केले जातात. मात्र त्याचा जास्त परिणाम होत नाही. घसा दुखायला लागला की, खोकल्याची समस्या वाढते. आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

कोमट पाणी प्या

घसा खवखवत असेल तर कोमट पाणी प्यावे. कोमट पाणी प्यायल्यास घशाला आराम मिळतो. छातीतील कफ बाहेर पडण्यास मदत होते.

हळद आणि पाणी

हळद आणि पाणी घसा दुखत असेल तर उपयोगी ठरते. पाण्यामध्ये हळद टाकून ते प्यायल्यास घशाला आराम मिळतो.

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे खूप उपयुक्त आहे. कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यास घशाची खवखव दूर होते. घशातील सूज, खाज आणि वेदनेपासून आराम मिळतो. गरम मीठाच्या पाण्याने गुळण्या करणे हा एक घरगुती आणि फायदेशीर उपाय आहे.

मसाला चहा

मसाला चहा प्यायल्याने घशाला आराम मिळतो. चहामध्ये काळी मिरी, तुळशीची पाने, दालचिनीचे तुकडे, लवंग, आले, वेलची टाका. हा चहा फक्त चवच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

गरम सूप

घसा खवखवत असेल तर गरम सूप प्यावे. सूप हे चवीसोबत आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. गरम सूप सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवून देण्यास मदत करतात

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा