फोटोगॅलरी

WhatsApp New Feature Alert : WhatsApp लवकरच ‘Scheduled Messages’ फीचर सुरू करणार

WhatsApp ने आणलेलं नवीन फीचर मोठी सोय ठरणार आहे. सध्या WABetaInfo ने सांगितले की WhatsApp लवकरच ‘Scheduled Messages’ फीचर सुरू करणार आहे

Published by : Varsha Bhasmare

जगभरातील कोट्यवधी युजर्ससाठी WhatsApp ने आणलेलं नवीन फीचर मोठी सोय ठरणार आहे. सध्या WABetaInfo ने सांगितले की WhatsApp लवकरच ‘Scheduled Messages’ फीचर सुरू करणार आहे, ज्यामुळे युजर्स आता आपले मेसेज वेळेनुसार शेड्युल करू शकतील.

वाढदिवसाच्या शुभेच्छा आता योग्य वेळेवर

अनेकदा मित्र किंवा नातेवाईकांचा वाढदिवस असताना रात्री १२ वाजेपर्यंत जागे राहून मेसेज पाठवणे कठीण होतं. आता या नवीन फीचरमुळे तुम्ही मेसेज अगोदर शेड्युल करू शकता आणि तो ज्या वेळी पाठवायचा आहे त्या वेळेस समोरच्या युजरच्या चॅटमध्ये पोहचेल. हे सुविधा खासकरून वाढदिवस, जॉइनिंग, इव्हेंट रिमाइंडर्ससाठी उपयोगी ठरणार आहे.

शेड्युल मेसेज कसा काम करेल?

  • युजर्स एका विशेष सेक्शनमध्ये आपले शेड्युल मेसेज पाहू शकतात.

  • मेसेज शेड्युल केल्यावर डिलिव्हरीपूर्वी युजर्स त्यामध्ये एडिट किंवा डिलीट करू शकतात.

  • शेड्युल मेसेज पाठवण्याच्या वेळी समोरच्या युजरला कोणतीही नोटिफिकेशन जाणार नाही.

  • सध्याचे टेस्टिंग iPhone युजर्ससाठी सुरु आहे आणि नंतर हळूहळू Android तसेच इतर युजर्ससाठी देखील हे फीचर उपलब्ध होणार आहे.

युजर्ससाठी फायदे

  1. वाढदिवस किंवा खास दिवसाची आठवण: कधीही विसर होणार नाही, मेसेज नेहमी योग्य वेळी पोहचेल.

  2. व्यस्त आयुष्यात मदत: कामाच्या किंवा प्रवासाच्या व्यस्त वेळेत देखील मेसेज वेळेवर पाठवता येईल.

  3. कस्टमायझेशन: शेड्युल मेसेजमध्ये सुधारणा किंवा हटवण्याची मुभा.

  4. व्यक्तिगत गोपनीयता: समोरच्या युजरला मेसेज शेड्युल केले गेले आहे हे दिसणार नाही.

WhatsApp च्या या नव्या फीचरमुळे आता ‘त्यावेळी मेसेज पाठवायचं विसरलो’ ही समस्या संपेल. युजर्स आता आपल्या खास संदेशांना योग्य वेळेत पोहचवून इम्प्रेशन वाढवू शकतील.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा