फोटोगॅलरी

Airplane : विमानाचा रंग पांढराच का असतो ? यामागचं वैज्ञानिक कारण जाणून थक्क व्हाल

आकाशात उंच उडणारी विमाने कधीही लाल किंवा पूर्णपणे काळ्या रंगाची नसतात. जवळपास सर्वच विमाने पांढऱ्या रंगाची असतात.

Published by : Varsha Bhasmare

1. आकाशात उंच उडणारी विमाने कधीही लाल किंवा पूर्णपणे काळ्या रंगाची नसतात. जवळपास सर्वच विमाने पांढऱ्या रंगाची असतात. हा रंग केवळ सौंदर्यासाठी नाही, तर सुरक्षितता, तापमान नियंत्रण आणि देखभाल सोपी व्हावी यासाठी निवडला जातो.

2. प्रवाशांची सुरक्षा, विज्ञान आणि विमाननिर्मितीतील खर्च लक्षात घेऊन विमानांचा रंग बहुतेक वेळा पांढरा ठेवला जातो. काही विमाने लाल किंवा काळ्या रंगाची असली तरी हजारो फूट उंचीवर उडताना सूर्यकिरण थेट विमानावर पडतात, त्यामुळे पांढरा रंग उष्णता कमी शोषतो.

3. सूर्याची किरणे विमानावर पडल्यावर त्याचा वरचा भाग खूप गरम होतो. पांढरा रंग सूर्यकिरणे मोठ्या प्रमाणात परावर्तित करतो आणि उष्णता कमी शोषतो. त्यामुळे विमानाचे तापमान नियंत्रणात राहावे व सुरक्षितता टिकावी यासाठी विमानांना कायम पांढरा रंग दिला जातो.

4. पांढऱ्या रंगामुळे विमान गरम होत नाही आणि त्याचे तापमान संतुलित राहते. पांढऱ्या रंगात केमिकल व पिगमेंट कमी असल्याने वजन वाढत नाही. गडद रंग दिल्यास रंगाचे वजन ७ ते ८ प्रवाशांइतके वाढू शकते.

5. वजन कमी राहावे यासाठी विमानाला कायम पांढरा रंग दिला जातो. पांढऱ्या रंगामुळे अतिरिक्त पिगमेंट लागत नाही. मात्र ओळखीसाठी काही विमानांवर कंपनीचे नाव किंवा चिन्ह लाल, निळ्या किंवा काळ्या रंगात रंगवलेले असते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा