फोटोगॅलरी

Mobile Charging Tips : रात्रभर फोन चार्जिंगला ठेवण्याची सवय घातक का ठरू शकते?

फोन पूर्ण चार्ज झाल्यानंतरही तो वीजपुरवठ्याला जोडलेला राहिला, तर बॅटरीवर सतत ताण येतो. यामुळे तिची कार्यक्षमता कमी होऊ शकते.

Published by : Riddhi Vanne

आजकाल अनेकांची सवय असते की झोपण्यापूर्वी मोबाईल चार्जिंगला लावायचा आणि सकाळी पूर्ण भरलेली बॅटरी घ्यायची. हे सोयीचे वाटत असले तरी दीर्घकाळात हीच सवय फोनसाठी घातक ठरू शकते.

100% चार्जची सवय योग्य का?

रोज सकाळी फुल चार्ज हवा म्हणून अनेकजण फोन रात्रभर प्लगमध्ये ठेवतात. पण बॅटरी पूर्ण भरल्यानंतरही ती सतत वीज घेत राहिली तर तिची क्षमता हळूहळू कमी होऊ शकते.

उष्णतेचा धोका

चार्जिंगदरम्यान फोन गरम होणे सामान्य आहे. मात्र तो उशीखाली किंवा गादीवर ठेवल्यास उष्णता बाहेर पडत नाही. त्यामुळे बॅटरी आणि फोनला इजा होऊ शकते.

विजेतील बदलांचा परिणाम

रात्री कधी कधी व्होल्टेजमध्ये चढ-उतार होतात. फोन सतत चार्जिंगला असेल तर याचा परिणाम चार्जिंग पोर्ट किंवा आतल्या भागांवर होऊ शकतो.

फोनची गती कमी होणे

सतत चार्जिंगमुळे बॅटरीवर ताण येतो. कालांतराने फोन स्लो होणे, अॅप उघडायला वेळ लागणे अशा तक्रारी वाढू शकतात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा