आयएमएतर्फे आयोजित व्हर्च्युअल कार्यक्रमात डॉक्टर दिनानिमित्त संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी कोविड -१९ साथीच्या आजारात डॉक्टरांच्या अथक सेवा केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. डॉक्टर दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनला योगाच्या फायद्यांविषयी संशोधन करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा डॉक्टर योगाचा अभ्यास करतात तेव्हा संपूर्ण जग त्याला गांभीर्याने घेते. आयएमएद्वारे असा अभ्यास एका मिशन मोडमध्ये पुढे जाऊ शकते? आपला योगावरील अभ्यास आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित केला जाऊ शकतो का? असे मोदींनी म्हटले आहे.
"आज आमच्या डॉक्टरांकडून कोविड संदर्भात नियम तयार केले जात आहे आणि ते लागू करण्यात येत आहेत. वैद्यकीय पायाभूत सुविधांकडे कसे दुर्लक्ष केले गेले हे आपण पाहिले आहे. तरीही, सर्व त्रासानंतरही भारताची स्थिती बर्याच विकसित देशांपेक्षा स्थिर आणि चांगली आहे" असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
"मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की संपूर्ण जागरूकतेने करोना नियमांचे पालन करा. आजकाल वैद्यकीय जगाशी संबंधित लोक योगाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढे येत आहेत. बर्याच आधुनिक वैद्यकीय विज्ञान संस्था करोनाचा संसर्ग झाल्यावर योगासून कसे बरे होऊ शकतात याचा अभ्यास करत आहेत," असे पंतप्रधानांनी म्हटले.