persons stealing Things from Airtel Tower caught by Police 
Mumbai

एअरटेल टॉवर मधून चोरी करणाऱ्यांना केली अटक

Published by : Vikrant Shinde

संदीप गायकवाड(वसई-विरार): पालघर जिल्हयात एअरटेल टॉवर (Airtel Tower) मधून 4G नेटवर्क (4G Network) करिता वापरण्यात येणाऱ्या AB, BTS व VIL कार्डची चोरी करणाऱ्या टोळीचं भांडफोड करण्यात वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश मिळालं आहे. यात 25 ते 30 वयोगटातील चार आरोपींना अटक करून त्याच्या ताब्यातील 13 AB,BTS,VIL कार्ड पोलिसांनी जप्त केले आहेत. अर्जुन मूलचंद यादव,अनिस हनिफ मलिक,रामसुरत शेषराम वर्मा,रामजनम राजेंद्रप्रसाद यादव,असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.याच्यावर पालघर जिल्ह्यातील वालीव,पेल्हार,डहाणू,सफाळा,मनोर या पाच पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत.परिसरातील टॉवरची रेखी करून आरोपी 4G नेटवर्क करिता वापरण्यात येणाऱ्या AB,BTS व VIL कार्डची चोरी करून भंगार भावात विकत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.वालीव पोलिसांनी तांत्रिक बाबींचा तपास करत cctv च्या आधारे आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.या बाबत वालीव पोलीस ठाण्यात कलम 379, 411, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा