एमडी, एमएस किंवा पदव्युत्तर पदविका अर्थात पीजी डिप्लोमा अशा अभ्यासक्रमांसाठी घेतली जाणारी NEET PG परीक्षा ११ सप्टेंबरला घेतली जाणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी जाहीर केले. विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय प्रवेश परीक्षा (नीट) देशभरातील ३ हजार ८४२ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. या परीक्षेसाठी १५ लाख ९७ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ८५ ते ९० टक्के विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. राज्यातील २ लाख २८ हजार ९१४ नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची ६१५ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.
दरम्यान, ऑफलाईन होणाऱ्या या परीक्षा नेमक्या कशा पद्धतीने घेतल्या जाणार, त्यांचा पॅटर्न काय असेल यासंदर्भात लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.