PM Narendra Modi  
Vidhansabha Election

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज 3 ठिकाणी सभा

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • पंतप्रधान मोदींच्या आज 3 ठिकाणी सभा

  • मुंबई, नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथे सभा होणार

  • खारघरच्या सेंट्रलपार्कमध्ये सभेची जोरदार तयारी

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज 3 ठिकाणी सभा होणार आहेत. यामध्ये मुंबई, नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथे या सभा होणार आहेत.

खारघरच्या सेंट्रलपार्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची जोरदार तयारी करण्यात आली असून सभेत एक लाखाहून अधीक लोक येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यासोबतच खारघरमध्ये पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो होणार आहे. याच पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. वाहतूक पर्याची मार्गाने वळवण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!