Ganesh Utsav 2021

Pune Ganeshotsav 2021:श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणरायाचे दिमाखात विसर्जन

Published by : Lokshahi News

मोरयाचा जयघोष, ध्वजाची सलामी, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि भंडाऱ्यांची उधळण अशा वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या 'श्रीं'ना निरोप देण्यात आला. शहरातील प्रमुख गणेशोत्सव मंडळ असणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणरायांचे विसर्जन दुपारी 2.30 वाजता झाले. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उत्सव मंडपात श्रींची आरती झाल्यानंतर विसर्जनाला सुरुवात झाली. 'मोरया.. मोरया'च्या जयघोषात मूर्ती विसर्जन कुंडांकडे दाखल झाली. तर 'पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणरायांना निरोप दिला. यावेळी ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन, अध्यक्ष संजीव जावळे यांसह मानाच्या आणि प्रमुख गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. विसर्जनापूर्वी गणरायांना 'वाद्यवृंद' या पथकाने ध्वजाची सलामी दिली. तर अखंडपणे चौघड्याचे वादन सुरू होते. यासह आरतीच्या वेळी मंदिरात कार्यकर्त्यांनी शंखनाद केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू