India

Puneet Rajkumar Passed Away | सुप्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेते पुनीत राजकुमार यांचे निधन

Published by : Lokshahi News

नंदकिशोर गावडे | कन्नड चित्रपट सृष्टीचे पितामह राजकुमार यांचे पुत्र आणि कन्नड चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे.ते 46 वर्षाचे होते.पुनीत राजकुमार यांच्या पश्चात पत्नी दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या या निधनाने कन्नड चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

अभिनेता पुनीत राजकुमार आज दुपारी १ ते १.३० च्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यावेळी त्याला तातडीने बंगळुरुतील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात आणले तेव्हा त्यांची प्रकृती खराब होती, आयसीयूमध्ये उपचार सूरू असल्याची माहिती विक्रम हॉस्पिटलचे डॉ रंगनाथ नायक यांनी दिली होती. दरम्यान रुग्णालय उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले आहे.

पुनीत राजकुमार यांच्या पश्चात पत्नी दोन मुली असा परिवार आहे. त्यांची मोठी मुलगी अमेरिकेत शिक्षण घेत आहे.पुनीत राजकुमार यांच्या निधनाचे वृत्त कळताच रुग्णालया बाहेर चित्र प्रेमींनी मोठी गर्दी केली आहे. पुनीत राजकुमार यांचे मोठे बंधू सुप्रसिद्ध अभिनेते शिवराजकुमार रूग्णालयात दाखल झाले आहेत. पुनीत राजकुमार यांचे पार्थिव सर्वप्रथम कंठीरवा स्टेडियम येथे नेण्यात येणार आहे.त्यानंतर सदाशिवनगर येथील त्यांच्या निवासस्थानाकडे नेण्यात येईल अशी माहिती उपलब्ध झाली आहे.त्यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपट सृष्टी सॅंडलवुडवर शोककळा पसरली आहे.

पुनीत राजकुमार हा कन्नड सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचा सर्वात लहान मुलगा आणि प्रख्यात स्टार KFI शिवराज कुमार यांचा धाकटा भाऊ आहे. त्याने बालकलाकार म्हणून तब्बल १२ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. १९८६ मध्ये बेट्टाड हूवू (Bettada Hoovu) या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट बाल अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. त्याने आतापर्यंत आकाश (२००५), अरसु (२००७), मिलन (२००७) आणि वंशी (२००८) यासारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."