India

ट्विटरचा देशाच्या राजकारणात हस्तक्षेप; राहुल गांधींचा आरोप

Published by : Lokshahi News

राहुल गांधी यांच नुकतच ट्विटर अकाऊंट तात्पुरत बंद झालं होत.तसेच अनेक कॉंग्रेस कार्यकर्त्यांची ट्विटर अकाऊंट तात्पुरती बंद झाली,"ट्विटरकडून देशाच्या राजकारणात हस्तक्षेप होतोय, सरकार सांगेल तसं वागत आहे". असा गंभीर आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. एक कंपनी म्हणून देशाचे राजकारण ठरवण्याचे काम ट्विटर करत आहे असा आरोप त्यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर करत म्हंटल आहे की "एक कंपनी म्हणून देशाचे राजकारण ठरवण्याचे काम ट्विटर करत आहे. हा देशाच्या लोकशाही रचनेवर हल्ला आहे. हा राहुल गांधींवर हल्ला नाही. हा फक्त माझा आवाज बंद करण्यापुरते नाही तर लाखो आणि करोडो लोकांना गप्प करण्याचा प्रयत्न आहे असे त्यांनी त्यांनी म्हटले आहे.

"माझे जवळजवळ १९ ते २० दशलक्ष फॉलोअर्स होते आणि तुम्ही त्यांना त्यांचे मत व्यक्त करण्यापासून रोखत आहात. हे तुम्ही काय करत आहात? ट्विटरने या कृतीने हे सिद्ध केले आहे की न्यूट्रल प्लॅटफॉर्म नाही. गुंतवणूकदारांसाठी ही एक धोकादायक गोष्ट आहे कारण राजकीय स्पर्धेत कोणाची बाजू घेतल्यास ट्विटरसाठी वाईट परिणाम होऊ शकतात". असे राहुल गांधींनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले "हा आपल्या लोकशाहीवर हल्ला होत आहे. आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. माध्यमांवर नियंत्रण आहे. मी समजत होतो की, ट्विटरच आशेचा एक किरण होता जिथे आपण ट्विटद्वारे आपला मुद्दा मांडू शकत होतो. पण ते तसे नाही. हे दर्शवते की ट्विटर हे तटस्थ व्यासपीठ नसून वस्तुनिष्ठ आहे, जे काही लोक त्यांच्या पद्धतीने वापरत आहेत. हे एक पक्षपाती व्यासपीठ आहे आणि ते सध्याचे सरकार जे म्हणते तेच ऐकते"

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

GST मध्ये मोठे बदल ; आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टप्पे

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Atal Setu : अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी

Imran Khan : इम्रान खान यांना मोठा दिलासा; जामीन मंजूर