काँग्रेस नेते राहुल गांधी नेहमीच त्यांच्या हटके वक्तव्यामुळे चर्चेत असतात. जर तुम्ही पंतप्रधान असता तर काय केलं असतं, असा प्रश्न राहुल यांना नुकताच एका मुलाखतीदरम्यान विचारला गेला. यावर राहुल यांनी दिलेलं उत्तर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अमेरिकेचे माजी राजदूत निकोलस बर्न्स यांनी राहुल गांधी यांची ऑनलाइन मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी राहुल यांना पंतप्रधान असता तर काय केलं असतं, असा सवाल केला. यावर बोलताना राहुल यांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले राहुल गांधी –
'मी पंतप्रधान असतो तर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर माझा भर असता. आपल्याला विकासाची गरज आहे, परंतु त्याचसोबत उत्पादन क्षमता वाढविणं आणि रोजगार उपलब्ध करण्यासाठी सर्वकाही केलं असतं. सध्या आपला विकास बघितला तर रोजगार निर्मिती, अतिरिक्त सुविधा आणि उत्पादन यांच्यात जसा ताळमेळ असायला हवा तसा दिसत नाही. व्हॅल्यू अॅडिशनमध्ये चीन पुढे आहे. मला असा एकही चीनी नेता भेटला नाही ज्यानं मला त्यांच्या देशात रोजगार निर्मितीची समस्या आहे', असं राहुल यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राहुल यांनी मुलाखतीत अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.