संघ आणि भाजपच्या विचारधारेशी काँग्रेस कधीही तडजोड करू शकत नाही. यामुळेच काँग्रेस आणि भाजपत विचारधारेचा संघर्ष आहे, अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. महिला काँग्रेसच्या ३८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
लक्ष्मीची शक्ती – रोजगार, दुर्गाची शक्ती – निर्भयता, सरस्वतीची शक्ती – ज्ञान. मात्र, भाजप या सर्व शक्ती हिसकावून घेत आहे. परंतु, आमचा हा संकल्प आहे की, या सर्व शक्ती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी लढाई करू. सावरकर आणि गोडसे यांचा उल्लेख करुन राहुल गांधी म्हणाले की, याच विचारसरणीने महात्मा गांधीजींचा जीव घेतला. संघ आणि भाजप हे नकली हिंदू असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.