India

“यापूर्वी देश एवढा असुरक्षित कधीच नव्हता”

Published by : Lokshahi News

उत्तर प्रदेशात दहशतवादविरोधी पथकाने दहशतवाद्यांना अटक मोठा कट उधळून लावल्यानंतर आता देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. यानंतर जम्मू-काश्मीरमध्येही काही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

यावरून आता काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केली असून, भारत एवढा असुरक्षित यापूर्वी कधीच नव्हता, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलंय.

मोदी सरकारने परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाचे राजकारण करून देशाला कमकुवत करण्याचे काम केले. भारत एवढा असुरक्षित कधीच नव्हता, असा मोठा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावरूनही राहुल गांधी यांनी टीका केली होती. मंत्र्यांची संख्या वाढली आहे, कोरोना लसीची नाही, असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी कणकवलीच्या मटका सेंटरवर टाकली धाड

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य