India

अखेर राहुल गांधींचं टि्वटर अकाऊंट ‘अनलॉक’

Published by : Lokshahi News

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट अखेर अनलॉक करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांच्यासहित काँग्रेसच्या इतर नेत्यांचंही ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरळीत करण्यात आलं आहे.

दिल्लील बलात्कार करुन हत्या झालेल्या नऊ वर्षाच्या पीडितेच्या कुटुंबाचे फोटो ट्विट केल्यानंतर ट्विटरने अकाऊंट बंद करत कारवाई केली होती. राहुल गांधी यांनी शुक्रवारी ट्विटरवर जोरदार टीका करताना देशाच्या राजकारणात हस्तक्षेप करत असल्याची टीका केली होती. त्यानंतर लगेचच टि्वटरकडून कारवाई मागे घेण्यात आली आहे.

'काँग्रेसची सर्व अकाऊंट्स अनलॉक करण्यात आली आहेत. यासाठी ट्विटरकडून कोणतंही कारण देण्यात आलेलं नाही,' अशी माहिती काँग्रेसचे सोशल मीडिया अकाऊंट इन-चार्ज रोहन गुप्ता यांनी दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!