थोडक्यात
मतपत्रिकेसाठी राहुल गांधींची यात्रा
'भारत जोडो’ यात्रेच्या धर्तीवर यात्रेचं आयोजन
मतपत्रिकेवर निवडणुका व्हाव्यात या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम
विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. यामध्ये महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला तर महाविकास आघाडीने 46 जागांवर विजय मिळवला. यामध्ये महायुतीत भाजपला 132 जागा, शिवसेना शिंदे गटाला 57 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 16 जागा, ठाकरे गटाला 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा मिळाल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावे असे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मतपत्रिकेसाठी यात्रेचं आयोजन करण्यात आले आहे.
याच्याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा होती. याच धर्तीवर आता मतपत्रिकेवर निवडणुका व्हाव्यात या मागणीसाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली यात्रा काढण्यात येणार असून मतपत्रिकेवर निवडणुका व्हाव्यात या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे.
यासोबतच जनतेच्या स्वाक्षऱ्यांचे लाखो अर्ज राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश व निवडणूक आयोगाला पाठवले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.