India

Rail Roko | आज देशभरात शेतकऱ्यांचा ‘रेल रोको’, सुरक्षा तैनात

Published by : Lokshahi News

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा तब्बल ८४ वा दिवस आहे. तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याची घोषणा केली आहे. आपला विरोध दर्शवण्यासाठी शेतकऱ्यांनी आज देशभरात 'रेल रोको' आंदोलन राबवण्याचा निर्णय घेतलाय. याच पार्श्वभूमीवर सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलीय.

  • दुपारी १२.०० ते दुपारी ४.०० पर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे.
  • पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासोबतच रेल्वेकडून सुरक्षा दलाच्या २० अतिरिक्त कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
  • रेल रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर रेल्वेगाड्यांच्या संचालनावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. विरोधाचे संकेत दिसताच संवेदनशील स्थळांची ओळख केली जाईल, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटलंय.
  • रेल्वे प्रोटेक्शन फोर्स अर्थात RPF चे पोलीस महासंचालक अरुण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाव्यवस्थापकांसोबत एक बैठक घेण्यात आलीय. महाव्यवस्थापक राज्य सरकारांसोबत संपर्कात राहून प्रत्येक ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!

Teachers Strike : शिक्षकांची शाळा बंदची हाक, सरकारला दिला आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Saif Ali Khan : सैफ अली खानला मोठा झटका – 15 हजार कोटींच्या मालमत्तेवर ‘शत्रू मालमत्ते’चा शिक्का