Headline

राज कुंद्राच्या अडचणींत वाढ;सुनावणी २० ऑगस्टपर्यंत लांबवली

Published by : Lokshahi News

पॉर्नोग्राफी प्रकरणी उद्योगपती राज कुंद्राच्या अडचणींमध्ये वाढच होत चालली आहे.राज कुंद्रा सध्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. राजने जामिन मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर आज, मंगळवारी सुनावणी होणार होती. परंतु न्यायालयाने राज कुंद्राच्या जामिनावरील सुनावणी २० ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलली आहे.

राज कुंद्रा आणि त्याचा साथीदार रायन थॉर्पे यांच्या जामिन अर्जावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतु ही सुनावणी आता २० ऑगस्टला घेण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे.त्यामुळे राज कुंद्रा आणि रायन थॉर्पेला तुरुंगातच रहावे लागणार आहे. याआधीही राज कुंद्राने दंडाधिकारी न्यायालयासमोर जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु त्याचा जामिन अर्ज न्यायालायने फेटाळून लावला होता.

राज कुंद्राला अटक झाल्यानंतर त्याच्या वकीलांनी त्याला झालेली अटक ही बेकायदा असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Buldhana : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टिका

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ

Pune : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक