rajendra gavit enters shivsena 
Candidates Profile

Rajendra Gavit: पाचव्यांदा पक्षांतर करणाऱ्या राजेंद्र गावित यांना पालघरमध्ये जयेंद्र दुबळांचे आव्हान

पालघरचे माजी खासदार राजेंद्र गावित यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी याआधी काँग्रेसमधून राज्यमंत्रीपद भूषवले होते. त्यानंतर त्यांनी भाजप, शिवसेना पुन्हा भाजप आणि आता ते शिवसेनेकडून (शिंदे गट) पालघर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. राजेंद्र गावित यांनी पाचव्यांदा पक्षांतर केले आहे.

Published by : Team Lokshahi

उमेदवाराचे नाव : राजेंद्र गावित

मतदारसंघ : पालघर

पक्षाचे नाव - शिवसेना

समोर कोणाचं आव्हान - जयेंद्र दुबळा

कोण आहेत राजेंद्र गावित?

राजेंद्र गावित यांचा जन्म 24 जुलै 1967 रोजी पालघरमध्ये झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. मूळचे काँग्रसचे कार्यकर्ते असलेले राजेंद्र गावित हे मुळचे नंदूरबारचे आहेत. ते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री होते.

राजेंद्र गावित यांचा राजकीय प्रवास

राजेंद्र गावित यांची राजकीय कारकीर्द फार मोठी नसली तरी त्यांची आतापर्यंतची वाटचाल पाहत आगामी काळात ते पालघरच्या स्थानिक राजकारणातील महत्वपूर्ण घटक ठरतील, अशी शक्यता वाटते. काँग्रेसमध्ये हीन दर्जाची वागणूक मिळत असल्यामुळे राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघर लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यासाठी 2018 साली पोटनिवडणूक झाली. त्यावेळी शिवसेनेने चिंतामण वगना यांचे सुपूत्र श्रीनिवास वगना यांना उमेदवारी देण्याची खेळी खेळली. त्यावेळी भाजपकडून राजेंद्र गावित यांना मैदानात उतरवण्यात आले. या निवडणुकीत राजेंद्र गावित यांनी बाजी मारली होती.

मात्र, 2019 मध्ये राजकीय समीकरणे बदलल्यामुळे शिवसेना-भाजप यांच्यात पुन्हा दिलजमाई झाली. जागावाटपात पालघर मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला होता. त्यामुळे राजेंद्र गावित यांचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेकडून त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. शिवसेना-भाजपच्या एकत्रित ताकदीच्या जोरावर राजेंद्र गावित यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही विजय मिळवला होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Adani Group : अदानी समूहाच्या कंपन्यांना सेबीकडून क्लीन चिट

Rohit Pawar : "कोर्टाची नोटीस मिळाल्यानंतर पाऊल उचलणार", कोकाटेंनी दिलेल्या मानहानीच्या नोटीसवर रोहित पवारांचं वक्तव्य

Gold Silver Rate : ग्राहकांची चिंता मिटली! लवकरच सोने-चांदीच्या भावात होणार मोठी घसरण; कधी ते जाणून घ्या

Chhagan Bhujbal : "अंतरवालीतील दगडफेक शरद पवारांच्या..." अंतरवालीतील दगडफेकीवर भुजबळांनी केला पडदाफाश