Vidhansabha Election

विधानसभा निवडणुकीच्या निकालात ठाकरे, पवारांसह काँग्रेसचाही नायनाट झालेला दिसेल : रामदास कदम

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. २० नोव्हेंबरला राज्यात मतदान होईल. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. याच पार्श्वभूमीवर मविआ आणि महायुतीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.

Published by : shweta walge

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. २० नोव्हेंबरला राज्यात मतदान होईल. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. याच पार्श्वभूमीवर मविआ आणि महायुतीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यातच आज शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी महायुतीतील जागा वाटपा संदर्भात प्रश्न विचारले असता महायुतीच्या सर्व नेत्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. जागा वाटपाचा जो निर्णय होईल तो निर्णय माझ्यासहीत सर्वांना मान्य असेल. कोणाचीही नाराजी नसेल' असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

ते म्हणाले की, अजून जागावाटप अधिकृत झालेल नाही. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जे काही जागावाटप होईल याबाबत शिवसेनेमध्ये कोणाचीही नाराजी नसेल माझ्यासह. ज्या काही जागा मिळतील त्यातील जास्तीत जास्त जागा कशा निवडून आणायच्या यासाठी प्रयत्न करणार असल्याच ते म्हणाले.

या निवडणुकांमध्ये निकाल लागेल तेव्हा उद्धव ठाकरे असू द्यात शरद पवार राष्ट्रवादी असू दे, काँग्रेस यांचा नायनाट झालेला दिसेल. योगेश कदम यांच्यासमोर जो उमेदवार उभा राहील त्याचं डिपॉझिट सुद्धा राहणार नाही. 1990 सालामध्ये दोन दोन गाड्या एसआरपीच्या खेडमध्ये असायच्या. गणपती शिमगा आला की दंगल व्हायची. मी जेव्हा आमदार म्हणून निवडून आलो त्यावेळी पासून दंगली थांबल्या. सर्वधर्म समभावाचे शिकवण मी दिली असं रामदास कदम म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा