Vidhansabha Election

'मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवार' रमेश केरे पाटील यांचा गंभीर आरोप

मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवार असल्याचा गंभीर आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी केला आहे.

Published by : shweta walge

मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवार असल्याचा गंभीर आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी केला आहे. शरद पवार पन्नास ते साठ वर्षांपासून राजकारणात असून मराठा आरक्षण संदर्भात त्यांनी कोणतीच ठोस भूमिका घेतली नसल्याचे देखील यांनी म्हटलं आहे. या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी उद्या अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

ते म्हणाले की, जर मनोज जरांगे पाटील यांनी सर्व पक्षांच्या विरोधात आपले उमेदवार उभे केले आणि जे जे आरक्षणाच्या विरोधात आहे, त्यांच्या बाबत भूमिका जाहीर केली, तर मराठा ठोक मोर्चाच्या वतीने आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देऊ, मात्र त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी कारण आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी जे रान उठवले होते याचा फायदा लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला झाला असल्याचं ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, मात्र त्यानंतर महाविकास आघाडीमधील एकही खासदार मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करत नसल्याने आता मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका जाहीर करावी आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहू असेही मराठा क्रांती ठोक मोर्चा चे समन्वयक रमेश केरे यांनी सांगितलय.

दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या अंतरवालीत मुलाखती घेतल्या आहेत. आता उद्या, रविवारी समाजबांधवांशी संवाद साधून ‘लढायचे की पाडायचे’ हा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pakistan News : ओळख विचारुन पंजाबमधील 9 जणांवर झाडल्या गोळ्या ; धक्कादायक प्रकार समोर

Gold Rate : सोन्याच्या दरात 27% वाढ ; गुंतवणूकदारांना लाभ, मात्र ग्राहकांच्या खिशाला कात्री

Ganpatipule Temple : गणपतीपुळे मंदिरात ड्रेसकोड लागू होणार

Axiom Mission 4 मोहिमेच्या यशस्वी प्रयोगानंतर शुभांशु शुक्ला 14 जुलैला परतणार