Vidhansabha Election

Rebellion of BJP aspirants in Risod Assembly to Shiv Sena?: रिसोड विधानसभेत भाजप इच्छुकाची बंडखोरी शिवसेनेला संपवण्यासाठी?

भाजपकडून इच्छुक असलेले माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी करत याच रिसोड मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं महायुतीमध्ये तणाव वाढला आहे.

Published by : Team Lokshahi

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. काहींनी प्रचाराला सुरूवात केली आहे. तर अजूनही काही पक्षात डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरु आहे. अनेक ठिकाणी नाराज इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अशातच वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघाची जागा शिंदेच्या शिवसेनेला मिळाली असून भावना गवळी यांना तिथून उमेदवारी मिळाली आहे. मात्र भाजपकडून इच्छुक असलेले माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी करत याच मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं महायुतीमध्ये तणाव वाढला आहे. भाजपची ही खेळी शिवसेनेला संपवण्यासाठी आहे का असा सवाल युवा सेना जिल्हाप्रमुख रवी भांदुर्गे यांनी उपस्थित केलाय.

तर अनंतराव देशमुख यांनी उमेदवारी मागे न घेतल्यास वाशिम जिल्ह्यात इतर दोन मतदारसंघामध्ये शिंदेंची शिवसेना वेगळी भूमिका घेणार असल्याचंही रवी भांदुर्गे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं आहे. अनंतराव देशमुख हे आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं सांगताहेत असा आरोप करत भांदुर्गे यांनी भाजपवर नाराजी बोलून दाखवली तर वरिष्ठांनी अनंतराव देशमुख यांची समजूत काढावी असे विनंतीही भांदुर्गे यांनी केलीये.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Video Viral : हिंदुस्तान जिंदाबाद... लंडनमध्ये मुस्लिम मुलींचं तिरंग्यासाठी भिडल्या; नेमकं प्रकरण काय?

AsiaCup 2025 : ...तरीही त्याला संघात संधी! कॅप्टन दादाकडून 'या' खेळाडूबद्दल महत्त्वाचं वक्तव्य; म्हणाला,

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनसुनावणी दरम्यान हल्ला; आरोपीबाबत महत्त्वाची बातमी समोर