Mumbai

Mumbai New Guidelines; मुंबईतील रात्रीच संचारबंदी हटवली, नवे नियम पाहूयात ?

Published by : Lokshahi News

कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने मुंबईतील निर्बंध आणखी शिथील करण्यात आले आहेत. मुंबईत रात्रीच संचारबंदी हटवण्यात आली आहे. तसेच सर्व पर्यटन स्थळही खुली होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान नेमके नवे नियम काय आहेत, ते पाहूयात…

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ओमिक्रॉनने मुंबईची चिंता चांगलीच वाढवली होती. कारण एकट्या मुंबईतील रुग्णसंख्या ही पंचवीस हजारांच्या जवळ जाऊन पोहोचली होती. मात्र गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या सतत नियंत्रणात येत आहे. तसेच मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या काही अंशी आटोक्यात येत असल्याने निर्बंध आता पुन्हा शिथिल करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून, हे नियम 28 फेब्रुवारी पर्यंत लागू असणार आहेत.

नवे नियम काय?

  • मुंबईत रात्रीची जमावबंदी हटवली
  • मुंबईतील नाईट लाईफ पुन्हा सुरु
  • टुरिस्ट स्पॉट, आठवडी बाजार, बीचेस, गार्डन, पार्क सुरु राहणार…
  • मैदानी खेळ- क्षमतेच्या २५% पर्यंत परवानगी
  • स्विमींग पुल, वॉटर पार्क ५०% क्षमतेनं सुरु राहणार
  • रेस्टॉरंट, थिएटर, नाट्यगृह ५०% क्षमतेनं सुरु
  • लग्नकार्यात क्षमतेच्या २५% किंवा २०० जणांना परवानगी
  • भजन, धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमांना ५०% क्षमतेनं परवानगी

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा