Rohit Pawar 
Vidhansabha Election

Rohit Pawar पाडणार उद्धव ठाकरेंचा उमेदवार?

सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. "मी वैयक्तिकपणे देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे. शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांनी मला प्रचाराला बोलावलं तर मी त्यांच्या प्रचाराला नक्की जाणार" असल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत.

Published by : Team Lokshahi

रोहित पवारांनी शेकापचे बाबासाहेब देशमुखांबाबत केलेल्या वक्तव्यानं मविआत सांगोल्याच्या जागेवरुन आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सांगोल्यातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून दीपक आबा साळुंखे पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच बाबासाहेब देशमुखांनी प्रचाराला बोलावल्यास त्यांचा प्रचार करणार असल्याचं वक्तव्य रोहित पवारांनी वक्तव्य केलं आहे.

सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. "मी वैयक्तिकपणे देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे. शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांनी मला प्रचाराला बोलावलं तर मी त्यांच्या प्रचाराला नक्की जाणार" असल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत. महाविकास आघाडीत सांगोला विधानसभा मतदारसंघातून बिघाडी झाल्याचे चित्र आहे. या ठिकाणी शिवसेनेच्या ठाकरे गटाने माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. तर शेकापाने देखील आपला उमेदवार जाहीर केला आहे. सांगोल्याच्या जागेवर काही तांत्रिक अडचणींमुळे उमेदवार जाहीर झाला असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सांगत आहेत. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांमध्ये सांगोल्याचा विषय स्पष्ट होईल.

"निवडणुकीमध्ये महायुतीकडून जवळपास तीन ते चार हजार कोटी रुपयांचा चुराडा होणार आहे. भ्रष्टाचारातून कमवलेले पैसे निवडणुकीमध्ये वापरले जाणार आहेत. महायुतीने कितीही पैशाचा वापर केला तरी महाराष्ट्रातील मतदार सुज्ञ आहे. तो महाविकास आघाडीलाच मतदान करणार आहे. महाविकास आघाडीच्या 180 जागा निवडून येतील" असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. आज दुपारपर्यंत 250 जागांवरील उमेदवारांची घोषणा केली जाईल. आणि उद्या उर्वरित 38 जागांचे उमेदवार जाहीर होणार असल्याची माहिती रोहित पवारांनी दिली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा