Uttar Maharashtra

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम; सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

Published by : left

मंगेश जोशी, जळगाव | रशियाने युक्रेनमधील (Russia-Ukraine war) सुरु असलेल्या युद्धामुळे सोने चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) चांगलीच चढ उतार होताना पाहायला मिळत आहे. त्याचाच परिणाम जळगाव सुवर्ण नगरीतील (Jalgaon Gold Market) सराफ बाजारावरही झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव (Gold Rate) ४८ हजार‍ावरुन ५५ हजार ६०० रुपय‍ापर्यंत पोहोचला होता. चांदीचे दरही (Silver Rate) दोन हजार रुपयांनी घसरुन चांदीचे भाव ६९ हजारांवर आले आहे.

जळगाव सुवर्णनगरी मध्ये नगरीतील (Jalgaon Gold Market) गेल्या दहा दिवसांत सोन्याचा भाव (Gold Rate) ४८ हजार‍ावरुन ५५ हजार ६०० रुपय‍ापर्यंत पोहोचला होता. म्हणजेच चार ते साडेचार हजार रुपयांपर्यंत सोन्याचे भाव (Gold Rate) वधारले होते. आता पुन्हा आठ दिवसात सोन्यात दरात (Gold Rate) मोठी घसरण झाली असून ५१ हजारापर्यंत दर झाले आहे. म्हणजेच ३ हजार ८०० रुपय‍ांपर्यंत घसरण सोन्याच्या दरात (Gold Rate) झाली आहे. सद्यस्थितीत सोन्याचे भाव (Gold Rate) ५१ हजार ८०० रुपये इतके आहे. चांदीचा भाव (Silver Rate) सुध्दा ७२ हजारापर्यंत वधारुन चकाकली होती. सोन्याच्या अपेक्षेने चांदीमध्ये पाहिजे तेवढी वाढ झालेली नाही. मात्र चांदीचे दरही (Silver Rate) दोन हजार रुपयांनी घसरुन चांदीचे भाव ६९ हजारांवर आले आहे.

रशिया व युक्रेनमधील युध्दाचे परिणाम, करार सामजंस्य यामुळे सोन्याच्या भावात चढ उतार होत आहे. युद्ध वाढले तर सोन्याचे दर पुन्हा वाढतील. दरम्यान या चढ उतारामुळे जळगावच्या सराफ बाजारावर (Jalgaon Gold Market) मोठा परिणाम झाला असून केवळ अत्यावश्यक व्यवहारांसाठीच ग्राहक सराफ व्यावसायिकांकडे येत आहेत. या व्यतिरिक्त लग्न सराईमुळे खरेदी करण्यासाठी नागरिक येताना दिसतात. या व्यतिरिक्त इतरांनी सराफ बाजाराकडे तूर्तास पाठ फिरविली आहे. चढ उतारामुळे ही गुंतवणुकीची वेळ नसल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले आहे. सोन्यात तेजी मंदीमुळे व्यवहारावरही परिणाम झाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख