Crude Oil 
India

भारताला मोठी बचतीची संधी: Crude Oil स्वस्तात अन रुपयांत मिळणार: यामुळे…

Published by : Jitendra Zavar

युक्रेन-रशिया (russia-ukraine war)युद्धामुळे अमेरिका, पाश्चात्त्य देशांच्या निर्बंधांचा सामना करणारा रशिया भारतासाठी फायदेशीर ठरु शकते. रशिया क्रूड ऑइलसाठी (Crude Oil)नवे ग्राहक शोधत आहे. यामुळे क्रूड ऑइल स्वस्तात मिळण्यासोबतच जगात रुपयाचा भावही वधारणार आहे. भारताला स्वस्त क्रूड ऑईल मिळाल्यास त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.

भारत क्रूड ऑईल (Crude Oil)पैकी ८५ टक्के आयात करतो. त्यासाठी डॉलरमध्ये पैसे मोजावे लागतात. परंतु आता युक्रेन-रशिया युद्धामुळे अनेक देशांनी रशियांवर निर्बंध लादले आहेत. यामुळे रशियाला क्रूड ऑईलसाठी (Crude Oil)नवे ग्राहक शोधावे लागत आहे. त्यासाठी रशिया भारतशी करार करण्याचा विचार करत आहे. भारत या कराराच्या अंतिम टप्यावर आहे. या करारानुसार शिपिंग आणि विम्याची जबाबदारी रशिया उचलेल. तसेच क्रूड ऑईल डॉलर ऐवजी रुपयांत मिळणार आहे. यामुळे पेट्रोलियम मार्केटमध्ये डॉलरची एकाधिकारशाही संपेल. चीन आपले चलन युआनद्वारे सौदी अरबकडून क्रूड खरेदी करू शकतो. स्वस्त क्रूड आल्यास पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढण्याचा दबाव कमी होईल.

इंडियन ऑइलने घेतले ३० लाख बॅरल क्रूड ऑइल
इंडियन ऑइलने रशियाकडून ३० लाख बॅरल क्रूडची खरेदी सवलतीच्या दरात केली आहे. यामुळे एका ट्रेडरच्या माध्यमातून २०-२५ डॉलर सवलतीवर ब्रेंट क्रूडचा व्यवहार झाला आहे.

भारताने एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ या काळात १७.६ कोटी टन क्रूडची आयात केली. त्याताल ३६ लाख टन रशियाहून आले. सध्या सवलतीच्या दरात रशियाकडून ३५ लाख बॅरल क्रूड खरेदी करण्याबाबत चर्चा सुरू आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा