Tensions on the Russia-Ukraine border also hit the stock market.  
International

Share Market : रशियाचा युक्रेनवर हल्ला; सेन्सेक्समध्ये 2700 अंकांची घसरण

Published by : Shweta Chavan-Zagade

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये (Russia-Ukraine war ) लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली आहे. परिणामी या युद्धामुळे सेन्सेक्समध्ये (Sensex) मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.  या पडझडीत सेन्सेक्स २७०० अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी तब्बल ८१५ अंकांनी कोसळला आहे. या घसरणीत जवळपास १२ लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

रशिया आणि युक्रेन सीमेवर (Russia-Ukraine war ) निर्माण झालेल्या तणावाचा फटका शेअर बाजारालाही बसला. शेअर बाजार (share market) सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स1,428.34 अंकांनी कोसळला. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातही घसरण दिसून आली.

सेन्सेक्स मंचावरील सर्वच्या सर्व ३० शेअरमध्ये मोठी घसरण झाली. एसबीआय, रिलायन्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, टीसीएस, या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे.

सेन्सेक्स घसरला –
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 1 हजार 428.34 अंकानी खाली आला आहे. त्यामुळे एकुण सेन्सेक्स 55 हजार 803.72 अंकावर स्थिरावर आहे. पुतीन यांच्या लष्करी कारवाईचा भारतीय बाजारावर परिणाम पडला आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

इंधनाचा भडका –

युक्रेन हा कच्चा तेलाचा प्रमुख निर्यातदार देश आहे. भारतात युक्रेनमधून इंधनाची आणि खाद्यतेलाची आयात केली जाते. युक्रेनमध्ये आणीबाणी लागली असून युद्धसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहे. इंधनाचा पुरवठा होत नसल्याने भारतात कच्चा तेलाच्या किंती प्रती बॅरल 100 डॉलर्सपेक्षाही अधिक झाल्या आहेत. त्यामुळे पट्रोल-डिझेल दरवाढ होणार असून सर्वसामान्यांना फटका बसणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sushil Kedia Post For Raj Thackeray : 'मी मराठी शिकणार नाही...' सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना पोस्ट करत डिवचलं

Ashadhi Wari 2025 : आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान