गणपती इतिहास

Sangali Gundewadi Village: सांगलीतील गुंडेवाडी गावच्या बाप्पाची का केली गेली वडाच्या झाडावर स्थापना? जाणून घ्या...

एक बाप्पा आहे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील गुंडेवाडी या गावातला, हा बाप्पा झाडावरचा बाप्पा म्हणून ओळखला जातो.

Published by : Team Lokshahi

मोठ्या जल्लोषात दरवर्षी बाप्पाच आगमन मुंबईत तसेच गावा गावात केलं जात. यावर्षी देखील मोठ्या गाजावाजात ठिकठिकाणच्या बाप्पाचे आगमन पार पडले आहे. गणपती आगमनादरम्यान गणेश भक्तांची देखील मोठी गर्दी पाहायला मिळाली. तर अनेक ठिकाणी बाप्पासाठी आकर्षक अशी सजावट आणि देखावा पाहायला मिळत आहे. अनेक अशा गणपती बाप्पाच्या अनोखा कथा देखील तितक्याच प्रसिद्ध आहेत. असाच एक बाप्पा आहे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील गुंडेवाडी या गावातला, हा बाप्पा झाडावरचा बाप्पा म्हणून ओळखला जातो.

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील गुंडेवाडी या गावात गेली 15 वर्षे झाली वडाच्या झाडावर गणरायाची स्थापना केली जाते. गणेशोत्सव साजरा करतं असताना जागा नसल्याने झाडावरच गणपतीची स्थापना केली जाते. झाडे न तोडता झाडावरच गणरायाची स्थापना करून मनोभावे त्याची पुजा केली जाते. तसेच वृक्षतोड न करण्याचा संदेश देखील याठिकाणी दिला जातो. या गावातील नागरिक सुरेश सुतार यांच्या डोक्यातील ही कल्पना आहे.

त्यांच्या मनात असं आलं होतं की आपण पर्यावरण पुरक बाप्पाची स्थापना केली पाहिजे आणि तेव्हापासून 2009 साली त्यांनी झाडावर गणपतीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला गावकऱ्यांनी देखील साथ दिली आणि एक गाव एक गणपती असा निश्चय केला आणि तेव्हापासून आत्तापर्यंत हा बाप्पा झाडावरचा बाप्पा म्हणून ओळखला जातो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज्यपाल आचार्य देवव्रत छत्रपती शिवाजी पार्कमध्ये

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप प्रगती होईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Nashik-Mumbai Highway Accident : नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात! बस चालकाचं नियंत्रण सुटलं अन्...15 ते 20 प्रवासी