Sanjay raut critising on cm eknath shinde Team Lokshahi
Mumbai

"वरळीतून शिवसेनेने जय शहांना उमेदवारी द्यावी अन्यथा शिंदेंनी स्वत: उभं राहावं," संजय राऊतांचा टोला

वरळीची जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Published by : Team Lokshahi

मुंबईतील वरळी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरे आणि मनसेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र अद्याप महायुतीतून या ठिकाणी कोणालाही उमेदवारी जाहीर झालेली नाही. वरळीची जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

"वरळीतून शिवसेनेने जय शहांना उमेदवारी द्यावी अन्यथा शिंदेंनी स्वत उभं राहावं", असा खोचक टोला राऊतांनी शिंदेंना लगावला आहे. तर आम्ही कधी जागावाटपासाठी आणि निर्णय देण्यासाठी दिल्लीत गेलो नाही असंही राऊतांनी म्हटलं आहे. त्यावर भाजप नेते नितेश राणेंनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदेच्या विरोधात आदित्य ठाकरे उभा राहणार होते त्याच काय झालं? आदित्य ठाकरे केवळ पोकळं धमक्या देतात असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला आहे.

दरम्यान, मिलिंद देवरा वरळीतून लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्या संदर्भात मिलिंद देवरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरा लढत पाहायला मिळणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा