Vidhansabha Election

Sanjay Raut On Vinod Tawde: विनोद तावडेंचं घबाड उघड ; राऊतांच्या मोठा दावा

संजय राऊत म्हणाले की, नालासोपारा विरारमध्ये जे घडलं आहे ते कॅमेरासमोर आहे. भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे

Published by : Team Lokshahi

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये राडा झाला आहे. हितेंद्र ठाकूर यांच्याकडून विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, विनोद तावडे यांनी हे आरोप फेटाळले आहेत. यापार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणाले की, नालासोपारा विरारमध्ये जे घडलं आहे ते कॅमेरासमोर आहे. भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे आणि आता त्यांचा या निवडणुकीतला खेळ संपला आहे. विनोद तावडे हे पक्षाचे महासचिव आहेत. बविआकडून विनोद तावडे यांच्याकडे पैसे असलेलं पकडल आहे विरारच्या एका हॉटेलमध्ये आता यावर भाजप काय खुलासा करणार आहे.

तावडेंची टिप देणारा भाजपचा माणूस! विनोद तावडेंच्या प्रकरणावर राऊतांचा मोठा दावा- संजय राऊत

विनोद तावडे यांच्या बद्दल टिप देणारा माणूस हा भाजपचा आहे. विनोद तावडे भविष्यात आपल्याला जड होतील कारण ते बविआचा चेहरा आहेत. कारण ते राष्ट्रीय सचिव आहेत त्यामुळे त्यांच्या हातात काही सुत्र आहेत. मोदी आणि शहा यांच्या जवळचा माणूस आहे त्यामुळे त्यांना अशाप्रकारे पकडून द्याव.. यासाठी भाजपकडून कटकारस्थान करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदार संघात किमान 15 ते 20 कोटी रुपये आचारसंहिता लागू होण्याआधी पोहचले आता नालासोपारा आणि परत नाशिकमध्ये पण शिंदे गट आणि भाजपचे पैसे वाटप पकडलं गेलं आहे. मुंबईमध्ये ठाण्यातून खास माणसांच्या पैसे वाटपासाठी देवणूका झालेल्या आहेत. शिंदे गटाचा एक माणूस आहे राम रेपाळे हा पैसे देवाणघेवाण करण्याचं काम करतो.

निवडणूक आयोगाने आमची तपासणी न करता भाजप आणि शिंदे गटाची तपासणी करावी- संजय राऊत

यावेळी बॅग तपासणीवरून जो काही ताणतणाव मविआमध्ये निर्माण झाला होता त्यावरून आता संजय राऊत म्हणाले की, आमच्या बॅगा तपासल्या, गाड्या तपासल्या आमची घरं तपासली, गाड्यांच्या डिक्की सारख्या उघडून तपासल्या... आमची तपासणी न करता निवडणूक आयोगाने जर भाजप आणि शिंदे गटाची तपासणी केली असती तर त्यांना 1 हजार कोटी रुपये मिळाले असते. विनोद तावडेंकडे 15 कोटींपेक्षा जास्त रक्कम होती असं मी ऐकल... त्यातून 5 कोटी रुपये वसई विरार नालासोपाऱ्याचे स्थानिक आमदार आहेत क्षितिज ठाकूर यांच्याकडे जप्त आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय