Budget 2022

Union Budget 2022 | गरीब कल्याण योजणेअंतर्गत 80 कोटी भारतीयांना मोफत धान्य – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

Published by : Lokshahi News

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून म्हणजेच 31 जानेवारीपासून सुरू होत आहे. परंपरेनुसार वर्षाचे पहिले अधिवेशन असल्याने अर्थसंकल्पीय (Budget 2022) अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्या भाषणाने होते. सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला राष्ट्रपती संबोधित करणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात सरकारच्या उपलब्धी आणि भविष्यातील योजनांचा तपशील देण्यात येतो.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर आर्थिक सर्वेक्षण 2021-22 दोन्ही सभागृहांमध्ये सादर केले जाणार आहे, ज्यामध्ये देशाच्या आर्थिक स्थितीचे तपशीलवार वर्णन सादर होणार आहे आणि अर्थव्यवस्थेची भविष्यातील दिशा ठरवली जाणार आहे.

याचभाषणादरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गरीब कल्याण योजणेअंतर्गत 80 कोटी भारतीयांना मोफत धान्य वाटप करण्यात आल्याची माहीती यावेळी संसदेत देण्यात आली आहे.

 गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अधिवेशनाचे कामकाज दोन सत्रांमध्ये होईल. २ ते ११ फेब्रुवारी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वार्धातील सभागृहांचे कामकाज प्रत्येकी पाच तास होणार आहे. राज्यसभेचे कामकाज सकाळी ९ ते दुपारी २ आणि लोकसभेचे कामकाज दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत चालेल. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सोमवारी आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडला जाईल. १ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ११ वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी शून्य प्रहर व प्रश्नोत्तराचा तास होणार नाही.

भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दरमहा गरिबांना मोफत रेशन- राष्ट्रपती रामनाथ कोविंद
  • देशात ७० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण- राष्ट्रपती
  • आमच्या सरकारचा मूलमंत्र हा सर्वांना समान न्याय, समान संधी आणि आदर देणे हा आहे- राष्ट्रपती
  • सरकार आणि जनतेमधील परस्पर विश्वास आणि सहकार्य हे भक्कम लोकशाहीचे उदाहरण- राष्ट्रपती रामनाथ कोविंद
  • आपण जगातील सर्वात जास्त लसीचे डोस असलेल्या आघाडीच्या देशांपैकी एक – राष्ट्रपती
  • ४४ कोटींहून अधिक लोकांच्या खात्यात थेट रक्कम जमा – राष्ट्रपती
  • तिहेरी तलाकला कायदेशीर गुन्हा घोषित करून समाजाला गैरप्रकारांपासून मुक्त केले – राष्ट्रपती

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज