आदेश वाकळे, संगमनेर | संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे तब्बल सात किलोचे रताळाचे (sweet potato) सापडल्याची घटना समोर आली आहे. हिराबाई नेहे या आजिबाईंच्या शेतात हा रताळा (sweet potato) पिकला आहे. हा निसर्गाचा चमत्कार असल्याचे बोलले जात असून, या रताळ्याची राज्यात एकच चर्चा रंगली आहे.
सावरगावतळ येथील हिराबाई नेहे या आजिबाईंच्या शेतात हा तब्बल सात किलोचे रताळा (sweet potato) पिकला आहे. हिराबाई नेहे यांचे शेत अतिशय हलक्या प्रतीचे म्हणजेच मुरमाड प्रकारचे असुन मागील वर्षीच्या खरिपाच्या ऑगस्ट महिन्यात त्यांनी कांदा पीक लावले होते.त्या पिकाच्या कडेला त्यांनी हा "रताळे"चा (sweet potato) वेल लावला होता.जेथे आता तीन चार महिन्यापासून कोणतेही पीक नाही त्यामुळे तेथे पाणी देण्याचा प्रश्नच नसतांना त्या एकाच रताळीच्या वेलाला जमिनीत एकच सात किलोवजनाचे "रताळयाचे" (sweet potato) कंद आलेये. त्याला कोणत्याही प्रकारचे खत ,औषध किंवा चार महिन्यापासून पाणी सुद्धा नसतांना ते आल्याने आता या सात किलोच्या रताळ्याची (sweet potato) चर्चा राज्यभरात होऊ लागली आहे.