shani dev in kumbh rashi team lokshahi
अध्यात्म-भविष्य

दिवाळीपूर्वी ‘या’ तीन राशी होणार मालामाल

शनि देव 15 नोव्हेंबरला कुंभ राशीतच मार्गक्रमण करणार आहे आणि तीन राशींवर 2025 पर्यंत कृपा दृष्टी दाखवणार आहे. त्या तीन राशी कोणत्या आहेत, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

Published by : Team Lokshahi

ज्योतिषशास्त्रात शनि देवाला महत्त्वाचे स्थान आहे. शनि देव जेव्हा चाल बदलतो, तेव्हा राशिचक्रातील 12 राशींवर प्रभाव पडतो. शनि देवाला कर्मदेव सुद्धा म्हटले जाते. जो प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. सध्या शनि कुंभ राशीमध्ये वक्री अवस्थेत विराजमान आहे. शनि देव 15 नोव्हेंबरला कुंभ राशीतच मार्गक्रमण करणार आहे आणि तीन राशींवर 2025 पर्यंत कृपा दृष्टी दाखवणार आहे. त्या तीन राशी कोणत्या आहेत, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

कर्क राशी

शनि या राशीच्या आठव्या स्थानावर विराजमान असून या राशीच्या कुटुंबातील सर्व अडचणी दूर होतील. या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेन आणि कुटुंबात वडीलांचे सहकार्य मिळेन. करिअरसाठी हा काळ उत्तम राहीन आणि त्यांना बॉसचे सहकार्य मिळेन. या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहीन आणि पैसा कमावण्याचे स्त्रोत वाढतील.

मिथुन राशी

मिथुन राशीच्या नवव्या भावात मार्गी होऊन शनि या राशीसाठी नशीबवान ठरणार आहे. खूप काळापासून हे लोक अडकलेले कामे पूर्ण करतील आणि त्यांना समाजात मान सन्मान मिळणार. या लोकांना नशीबाची साथ मिळेल आणि सर्व क्षेत्रात यश मिळवतील. तसेच या लोकांना उच्च पद मिळेल. या लोकांची प्रगती होईल. या लोकांचे विदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात आणि या लोकांच्या जीवनात भरपूर समृद्धी नांदेल.

धनु राशी

धनु राशीच्या तिसऱ्या भावात मार्गी होऊन शनिदेव या राशीच्या लोकांवर कृपा दाखवेन. या लोकांची करिअरमध्ये खूप प्रगती होईल. या लोकांच्या कामाचे सर्वत्र कौतुक केले जाईल आणि बॉस आनंदी होऊन यांचे प्रमोशन करू शकतात. नोकरीच्या शोधात असणार्‍या लोकांना खूप चांगली नोकरी मिळू शकते. या लोकांच्या कुटुंबातील समस्या दूर होऊ शकतात. बुद्धीच्या जोरावर हे लोक स्वत:ची एक आगळी वेगळी ओळख निर्माण करेन.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा