Vidhansabha Election

युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात; 'या' ठिकाणी घेणार सभा

बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात

  • बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार

  • शरद पवार घेणार जाहीर सभा

अमोल धर्माधिकारी, पुणे

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद, सभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरले असल्याचे पाहायला मिळत असून आज शरद पवार यांची शिरसुफळ सुपा, मोरगाव, सोमेश्वर या ठिकाणी जाहीर सभा घेणार असून संध्याकाळी बारामतीत व्यापारी मेळावा, डॉ मेळावा आणि वकील मेळावा शरद पवार घेणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय