India

आत्महत्येपूर्वी हसत-हसत तिनं बनवला व्हिडिओ; नेटीजन्स करतायत न्यायाची मागणी

Published by : Lokshahi News

डियर डॅड, माझे जीवन इथपर्यंतच आहे, मी खुश आहे की आता लवकरच माझी भेट अल्लाह सोबत होईल" असे बोलून आयेशा बानो नामक विवाहीतीने नदीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी तिने एक व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर शेअर होत आहे. ट्विटरवर #Ayesha असे ट्रेंड होत असून नेटीजन्स न्यायाची मागणी करतायत.

गुजरातच्या अहमदाबादमधील आयेशा बानो नामक २३ वर्षीय विवाहितेने साबरमती नदीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने एक व्हिडिओ बनवला. या व्हिडीओत पाणावलेल्या डोळ्यांनी ती, 'मी हे जे पाऊल उचलत आहे, ते कुणाच्याही दबावाखाली नाही. माझं आयुष्यच इतकं होतं. प्रिय बाबा, कधीपर्यंत तुम्ही आपल्याच लोकांशी संघर्ष कराल. तुम्ही केस मागे घ्या' असे ती म्हणतेय.

हा हुंडाबळीचा प्रकार असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत असल्याचे सांगण्यात येत आहे. आयशा बानो मकरानी हिचा हुंड्यासाठी तिची सासरची मंडळी छळ करत होती, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. तसेच आरिफ याच्याविरोधात आयशाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

आत्महत्यापूर्वीचा आयशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात ती हसत हसत व्यक्त होताना दिसत आहे. बोलता बोलता शेवटी तिच्या डोळ्यांत अश्रू आलेत. आयशाला न्याय मिळावा अशी मागणी आता सोशल मीडियावरून होत आहे. तसेच ट्विटरवर #Ayesha असे ट्रेंड होत आहे. तसेच या हॅशटॅग ट्रेंड होत असून नेटीजन्स तिला न्याय मिळवून देण्याची मागणी करत आहेत.

घटनाक्रम

आयशाचे लग्न जुलै २०१८मध्ये आरिफ खान याच्याशी झाले होते. काही दिवसांनंतर आरिफचे कुटुंबीय हुंड्याची मागणी केली. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये आयशा आपल्या माहेरी आली. मात्र, समाजातील काही लोकांनी मध्यस्थी केल्यानंतर ती पुन्हा सासरी गेली. आरिफला आयशाच्या कुटुंबीयांनी दीड लाख रुपयेही दिले. मात्र, परिस्थिती बदलली नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!