Vidhansabha Election

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देत म्हटलं की लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही. महायुतीच्या सरकारने सव्वा दोन वर्षात केलेली कामं लोकांनी पाहिली आहेत.

Published by : shweta walge

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला होता. याबाबत अंबरनाथमध्ये आलेले श्रीकांत शिंदे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी ही टीका केली. "आता तुमचा परफॉर्मन्स कसा आहे? लोकांनी तुम्हाला पूर्णपणे नाकारलेलं आहे. ज्या लोकांनी अडीच वर्ष तुम्हाला सत्ता दिली होती, ती अडीच वर्ष तुम्ही फक्त घरी बसले. अडीच वर्षात कोव्हीडच्या काळात किती भ्रष्टाचार केले, हे लोकांनी पाहिलेलं आहे. तर सव्वा दोन वर्षात महायुतीच्या सरकारने किती कामं केली, हे सुद्धा लोकांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं सरकार नाही. म्हणून कायमचं घरी बसवण्याचं काम लोकांनी करून टाकलेलं आहे, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."